Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Micro Food processing Scheme: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ कसा घ्याल?

PMFME Scheme

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. 29 जून 2020 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ही योजना सुरू केली. स्थानिक लहान उद्योगांना या योजनेद्वारे मदत करण्यात येते.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. 29 जून 2020 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ही योजना सुरू केली. स्थानिक लहान उद्योगांना या योजनेद्वारे मदत करण्यात येते. आत्मनिर्भर भारत अभियान योजनेला बळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअतंर्गत अन्न प्रक्रिया उद्योगातील सूक्ष्म व्यवसायांना पतपुरवठा करण्यात येतो. स्वंय सहायता गट, अल्पबचत गट, वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांना या योजनेतून कर्जपुरवठा करण्यात येतो.

योजनेतून मिळणारे फायदे

1)या योजनेद्वारे अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सूक्ष्म उद्योगांना एकूण प्रकल्पाच्या 35 टक्के पतपुरवठा केला जातो. 
2) जास्तीत जास्त १० लाख रुपये या योजनेद्वारे उद्योग उभा करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मिळतात. 
3) स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल आणि उपकरणेही दिली जातात. 
4) उद्योगाचे प्रशिक्षण आणि सहाकार्य प्रकल्पाच्या ठिकाणीच उपलब्ध करुन देण्यात येते. 
5) महिला उद्योजिकांना प्राधान्य देण्यात येते.

या योजनेद्वारे उद्योगांना असंघटीत क्षेत्रातून संघटीत क्षेत्रामध्ये येण्यास मदत केली जाते. त्यामुळे भविष्यातही संस्थांद्वारे पतपुरवठा मिळू शकतो. सध्या ही देशभरात राबवली जाते. (www.pmfme.mofpi.gov.in) योजनेच्या लाभासाठी या पोर्टलवरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. दरवर्षी 50 हजारांपेक्षा जास्त अर्ज येतात. एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP-One District One Product) या आधारावर राबविली जाते. या योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना (Vocal for Local) प्रोत्साहन देण्यात येते.

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था /कंपनी, स्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीकरिता बॅंक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान मिळू शकते. याकरिता कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल. ज्यूस, जाम, जेली, पल्प, नेक्टर, टॉफी,  RTS पेय, वाईन, प्यूरी,चॉकलेट, चीज, फ्रुटबार, टॉफीज या सारख्या अनेक अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी पतपुरवठा मिळू शकतो.