• 03 Oct, 2022 22:50

ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणजे काय?

block chain

ब्लॉकचेन डेव्हलपरला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरचे वार्षिक उत्पन्न (blockchain developer salary) 8 ते 20 लाख रुपये एवढे असते.

सुरुवातीला ब्लॉकचेन (Blockchain) तंत्रज्ञानाची निर्मिती बिटकॉईन (Bitcoin) या जगप्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी तयार करण्यासाठी झाली होती. पण काळाबरोबर या तंत्रज्ञानाकडे डिजिटल जगातील क्रांती आणणाऱ्या अनेक तंत्रज्ञानापैकी एक या स्वरूपात पहिलं जातं आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अष्टपैलुत्व अनेक उद्योग विभागात प्रगती आणत असल्याने लोकांचे व अनेक देशांच्या सरकारचे विशेष लक्ष या तंत्रज्ञानाने वेधून घेतले आहे.

तुम्हाला जर या क्षेत्रात उतरायचे असेल; तर या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. ब्लॉकचेन विकसक (Blockchain Developer) यांना क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी मागणी आहे. ब्लॉकचेन विकसक (Blockchain Developer) म्हणजे काय? त्यासाठी काय केले पाहिजे? ब्लॉकचेन विकसक कसे बनता येईल? यांसारख्या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.


सर्वप्रथम आपण, Blockchain Developer करतो काय? हे जाणून घेऊयात. या प्रश्नाचं साधं आणि सोपं उत्तर म्हणजे, डेव्हलपर ब्लॉकचेन (Blockchain) तयार करतो. ब्लॉकचेन डेव्हलपर दोन प्रकारचे असतात. एक कोर ब्लॉकचेन विकसक (Core Blockchain Developer) आणि दुसरा ब्लॉकचेन सॉफ्टवेअर विकसक (Blockchain Software Developer).

कोर ब्लॉकचेन विकसक (Core Blockchain Developer) 

कोर ब्लॉकचेन विकसक (Core Blockchain Developer) प्रस्तावित ब्लॉकचेन प्रणालीच्या सुरक्षा व आर्किटेक्चरचे डिझाईन तयार करतात. अर्थात कोर ब्लॉकचेन विकसक (Core Blockchain Developer) पाया तयार करण्याचे काम करतात.

ब्लॉकचेन सॉफ्टवेअर विकसक (Blockchain Software Developer)

ब्लॉकचेन सॉफ्टवेअर विकसक (Blockchain Software Developer) तयार केलेल्या आर्किटेक्चरचा वापर करून विकेंद्रित (Decentralised) अॅप्स (Apps) आणि वेब व्हरायटीज (Web  Varieties) तयार करतात. आव्हानात्मक समस्यांवर तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण उपाय काढणे, ही ब्लॉकचेन विकसकाची जबाबदारी असते. 

Blockchain Developer

Blockchain Developer होण्यासाठी तुम्हाला डिग्रीची आवश्यकता असतेच असे नाही. तुमच्या कौशल्यांच्या बळावर तुम्ही डेव्हलपर होऊ शकता. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्याचा मार्ग तसा कठीण आहे. तुम्ही अगदी शून्यापासून सुरुवात करत असाल तर तो थोडा त्रासदायक वाटू शकतो. पण योग्य मार्गदर्शन व मेहनतीच्या बळावर तुम्ही ब्लॉकचेन डेव्हलपर नक्की होऊ शकता. यासाठी खालील मुद्दे समजून घेणं आवश्यक आहे.

ब्लॉकचेनची गरज का आहे?

ब्लॉकचेनची निर्मिती बिटकॉईनची (Bitcoin) संकल्पना वास्तवात आणण्यासाठी तयार केली गेली होती. त्यामुळे तुम्हाला बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. या संबंधित अनेक YouTube व्हिडिओस उपलब्ध आहेत.

ब्लॉकचेन डेव्हलपमेंटबद्दल जाणून घ्या!   

CryptoZombies आणि SpaceDoggos अशा काही वेबसाइटवरील कोर्सेसच्या मदतीने तुम्ही सॉलिडिटी कोड (Solidity Code) शिकू शकता. या कोडचा वापर ब्लॉकचेन तंत्रज्ञानात केला जातो. ज्याने ब्लॉकचेन डेव्हलपमेंटच्या संकल्पानांबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. 

वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांबद्दल जाणून घेणे

चांगल्या ब्लॉकचेन डेव्हलपरला प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. C++, SQL, JavaScript आणि Python या कोडिंग किंवा संगणकीय भाषांचे (Computerised Language) ज्ञान तुम्ही मिळवू शकता. 

ब्लॉकचेन डेव्हलपर कोर्स 

ब्लॉकचेन डेव्हलपरचे अनेक ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याद्वारे तुम्हाला तुमच्या कौशल्यांमध्ये वाढ करता येईल किंवा अशा कोर्सेसमधून कौशल्ये अधिक विकसित करता येतील.

ब्लॉकचेन डेव्हलपरला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरचे वार्षिक उत्पन्न (Annual Package) 8 ते 20 लाख रुपये एवढे असते. या क्षेत्रात तुम्ही जेवढी कौशल्ये विकसित कराल; तेवढे तुम्हाला अधिक महत्त्व मिळेल.