• 04 Oct, 2022 16:30

बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

हाँगकाँग विद्यापीठातील (The University of Hong Kong - HKU) आर्किटेक्चरल रिसर्च टीमने विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार केली. या प्रणालीला ई-इन्स्पेक्शन 2.0 (E-Inspection 2.0) असे नाव दिले आहे.

हाँगकाँग विद्यापीठातील (The University of Hong Kong - HKU) आर्किटेक्चरल रिसर्च टीमने विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार केली. या प्रणालीला ई-इन्स्पेक्शन 2.0 (E-Inspection 2.0) असे नाव दिले आहे. ब्लॉकचेनवर आधारित तयार करण्यात आलेली ही प्रणाली बांधकामासाठी (blockchain in construction) वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात मदत करते.

ब्लॉकचेन प्रणालीतील (blockchain in construction) सेन्सर्सद्वारे वातावरणातील तापमान, आर्द्रता, कंपन आणि ठिकाणाची माहिती गोळा केली जाते. या जमा केलेल्या माहितीच्या आधारे बिल्डिंग मॉड्यूल्सचा आढावा घेऊन वातावरणातील आर्द्रता किंवा इतर घटकांमुळे बांधकाम करण्यात आलेल्या वास्तूवर काही परिणाम होतो की नाही, हे तपासता येते.


हाँगकाँग विद्यापीठात (The University of Hong Kong - HKU) मॉड्युलर इंटिग्रेटेड कन्स्ट्रक्शन (MiC) पद्धतीचा वापर करून नवीन हॉस्टेल उभारले जात आहे. या नवीन हॉस्टेलचे नाव ‘वोंग चुक हँग’ असे आहे. या  हॉस्टेलच्या इमारतीसाठी ग्वांगडोंग प्रांतातील एका कारखान्यात या अत्याधुनिक प्रणालीचे सुमारे एक हजार बिल्डिंग ब्लॉक्स एकत्र केले गेले आणि त्यानंतर याचा वापर विद्यापीठातील इमारतीसाठी करण्यात आला. कोविड-19 च्या उद्रेकादरम्यान सीमा बंद आणि इतर खबरदारीचा परिणाम म्हणून, गुणवत्ता निरीक्षकांना ग्वांगडोंगमधील कारखान्यात प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे या बांधकामाची गुणवत्ता तपासणीसाठी ब्लॉकचेन प्रणालीचा (blockchain solution to track construction quality) वापर करण्यात आला.

ब्लॉकचेन (Blockchain) तंत्रज्ञान म्हणजे काय?

ब्लॉकचेनला जतन केलेल्या माहितीचा संग्रहक म्हटले जाऊ शकते. ब्लॉकचेन हे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि क्रिप्टोग्राफीचा वापर करून ते संरक्षित केले आहेत. हे तंत्र माहिती बदलण्यासाठी प्रतिरोधक आहे. म्हणजे याता जतन झालेली माहिती बदलणे फार कठीण आहे.

Blockchain-in-construction-rd2.gif

स्त्रोत : BIG RENTZ