• 05 Feb, 2023 12:42

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Kesari Winner Prize: महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानास बक्षिस स्वरूपात काय मिळते?

Maharashtra Kesari Winner Prize

Image Source : http://www.indianexpress.com/

Maharashtra Kesari Competition: पैलवानांसाठी 'महाराष्ट्र केसरी स्पर्धा'चे आयोजन केले जाते. ही स्पर्धा पैलवानांसाठी मानाची मानली जाते. नुकतेच काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात ही स्पर्धा पार पडली. मात्र कुस्ती जिंकणाऱ्या विजेत्यास बक्षिस स्वरूपात काय मिळते हे आपण जाणून घेवुयात.

Maharashtra Kesari Winner Prize: पुणे शहरात पार नुकतीच ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धा’ (Maharashtra Kesari Competition)  पार पडली. या स्पर्धेत राजगुरूचा पैलवान ‘शिवराज राक्षे’ने (Shivraj Rakshe) बाजी मारली. तर उपविजेता हा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) ठरला आहे. या स्पर्धेतील पैलवान सिंकदर शेख (Sikandar Shaikh Kushti) हा माझ्यावर अन्याय झाला असल्याचे सांगत आहे. त्यामुळे याबाबत मोठी चर्चा होत आहे. असो, मात्र महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेला बक्षिस स्वरूपात काय मिळाले, याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

विजेत्यास काय मिळाले (What Does The Winner Get)

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेता झालेला पैलवान शिवराज राक्षेला एक चांदीची गदा देण्यात आली. सोबतच महिंद्रा थार गाडी व रोख 5 लाख रूपये रक्कम बक्षिस स्वरूपात देण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी नुकतीच घोषणा केली की, महाराष्ट्र केसरी विजेत्याचे मानधन हे 4 हजारावरून 15 हजार करण्यात येणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड यास चांदीची गदा, ट्रॅक्टर व रोख अडीच लाख रूपये बक्षिस म्हणून मिळाले आहे. राज्य अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटातील विजेत्या ठरलेल्या खेळाडूस सुवर्णपदक व एसडी जावा गाडी बक्षिसच्या स्वरूपात देण्यात आली आहे.

900 पेक्षा अधिक स्पर्धक (More than 900 Contestants)

पैलवानांची मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्यातील 45 तालीम संघातील विविध 18 वजनी गटात सुमारे 900 पेक्षा अधिक पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धेचा थरार पुण्यातील कोथरूड भागात रंगला होता. या ठिकाणी 32 एकर जागेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये 12 एकरमध्ये 80 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असणारे मैदान, दोन माती व तीन गादीचे आखाडे तयार करण्यात आले होते.

केसरी विजेता विजय चौधरी प्रतिक्रिया (Kesari Winner Vijay Chaudhary Reacts)

या स्पर्धेच्यावेळी महाराष्ट्र केसरी विजेता ठरलेले विजय चौधरी उपस्थित होते. ते म्हणाले, शासनाने मला ज्या प्रमाणे खात्यात रूजू करून महाराष्ट्र केसरी मल्लाला एक दर्जा दिला आहे, त्याप्रमाणे यापुढे ही सर्व महाराष्ट्र केसरी विजेत्यास हा दर्जा दिला गेला पाहिजे. त्यांनादेखील एका चांगली सरकारी नोकरीवर नियुक्त केले गेले पाहिजे. महाराष्ट्र केसरी या नावातच एक वेगळे वजन आहे. यंदाचे महाराष्ट्र केसरी विजेत्यास मिळणारे बक्षिस हे लक्षणीय आहे.