सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. मंगळवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे. देशात एकीकडे अर्थसंकल्पाची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे अदानी ग्रुप समोर उभे ठाकलेले आर्थिक संकट याची चर्चा आहे. असंख्य गुंतवणूकदार तर अदानी ग्रुपसंबंधी काय घडते आहे यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कारण प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रीतीने असंख्य जणांचे पैसे यात गुंतलेले आहेत. यामुळे केंद्रीय पातळीवरील उच्च स्तरावर या प्रश्नाकडे कसे बघितले जात आहे, हे जाणून घेणे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
गौतम अदानी यांच्यावरील प्रश्नावर काय म्हणाले नागेश्वरन
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. मंगळवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. यासंबंधी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांना गौतम अदानीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले ‘’आर्थिक सर्वेमध्ये आम्ही कोणत्याही सिंगल कंपनीवर कमेंट करत नाही. पूर्ण कार्पोरेट क्षेत्रावरील कर्ज कमी झाले आहे आणि बॅलन्सशीट हेलदी आहे. एका कार्पोरेट सेक्टरमध्ये काय होत हे एक कार्पोरेट ग्रुप आणि मार्केटमधील प्रश्न आहे.’’
हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये अदानी ग्रुप संबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याचा अदानी ग्रुपमधील शेअर्सवर मोठा परिणाम झाला. अदानी यांच्या कॅपिटलमध्येही यामुळे मोठी घट झालेली बघायला मिळाली. त्यांची श्रीमंती ही आता 10 नंबरच्या पुढे गेली आहे. जी अगदी काही दिवसापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर होती अदानी ग्रुप मध्ये प्रत्यक्ष–अप्रत्यक्षरित्या देशातील असंख्य नागरिकांची गुंतवणूक आहे. एलआयसीची अदानी ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक आहे. तसेच अनेक म्युच्युअल फंडची देखील अदानी ग्रुपच्या समभागांमध्ये गुंतवणूक आहे. या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपचे काय होते हा अशा गुंतवणूदारांसाठी महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे गुंतवणूकदार यासंबंधी देशाच्या वरिष्ठ पातळीवर काय विचार केला जात आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक पाहणी संबंधित पत्रकार परिषदेत अदानी यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर नागेश्वरन यांनी हे भाष्य केले आहे.