Education Loan Of Saraswat Bank: सारस्वत बँक ही भारतासह महाराष्ट्रात स्थित असलेली नागरी सहकारी बँकिंग संस्था आहे आणि 1918 पासून सहकारी बँक म्हणून कार्यरत आहे. सध्या बँकेचे 45 देशांमधील 125 पेक्षा जास्त बँकांशी पत्रव्यवहाराचे संबंध आहेत, ज्यात नऊ चलनांचा समावेश आहे. बँकेचे 282 संपूर्ण संगणकीकृत शाखांचे जाळे असून त्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली या सहा राज्यांचा समावेश आहे.
Table of contents [Show]
शैक्षणिक कर्ज म्हणजे काय?
शैक्षणिक कर्ज म्हणजे एखाद्या व्यक्तीने भारतात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी घेतलेले कर्ज किंवा रक्कम होय. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची कर्जाची परतफेड करणे सुरू होते आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी किंवा जॉइन करण्यासाठी 6 महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जातो.
शैक्षणिक कर्ज घेताच, त्यावरील व्याज सुरु होते. त्यामुळे पदवीधर झाल्यानंतर किंवा नोकरी लागल्यानंतर तुम्हाला परतफेड करतांना एक मोठी रक्कम भरावी लागते.
दुसरा पर्याय असा आहे की, तुमचे पालक जर तुम्ही शिक्षण घेत असलेल्या कालावधी दरम्यान ते कर्ज प्रत्येक महिन्यानुसार परतफेड करीत असेल तर, कर्जा वरील व्याजाची रक्कम लक्षणीयरीत्या कमी होते.
सारस्वत बँकेच्या शैक्षणिक कर्जाचे फायदे
- कमी व्याजदर
- कोणतेही छुपे खर्च आणि प्रशासकीय शुल्क नाही
- कमी पेपरवर्क
- प्रक्रिया शुल्क नाही
- 4 लाखांपर्यंत सुरक्षा ठेव आवश्यक नाही
- विद्यार्थिनींसाठी 0.50% सवलत
अर्ज कोण करू शकते
IBA मान्यताप्राप्त कॉलेज,संस्था किंवा विद्यापीठाद्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश मिळवलेली व्यक्ती. यामध्ये विद्यार्थी अर्जदार असावा आणि पालक किंवा नातेवाईक सह-अर्जदार असावेत.
कर्जाची रक्कम
भारतात निवडलेल्या अभ्यासक्रमांसाठी किमान 10 लाख रुपये आणि कमाल 30 लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. तर, परदेशात निवडलेल्या अभ्यासक्रमांसाठी कमाल 50 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते.
परतफेड कालावधी
Moratorium कालावधी वगळून कमाल 12 वर्षांचा परतफेड कालावधी आहे. Moratorium कालावधी हा तीन वर्षे किंवा अभ्यासक्रमाचा कालावधी अधिक एक वर्ष यापैकी जे आधी असेल त्यानुसार असतो.
प्रक्रिया शुल्क
भारतातील शिक्षणासाठी कर्ज घेतल्यास कुठलेही प्रक्रिया शुल्क लागत नाही.
परदेशातील अभ्यासासाठी कर्ज घेतल्यास कर्जाच्या रकमेच्या 0.5% कमाल शुल्क आकारण्यात येते.
भारतातील या अभ्यासक्रमासाठी कर्ज दिल्या जाते.
UGC, AICTE,IMC आणि सरकार मान्यताप्राप्त अभ्यासक्रम.
महाविद्यालये किंवा विद्यापीठांद्वारे आयोजित नियमित तांत्रिक आणि व्यावसायिक पदवी-डिप्लोमा अभ्यासक्रमांसह पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम.
आयआयटी, आयआयएम इत्यादी स्वायत्त संस्थांद्वारे नियमित पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम.
केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने मंजूर केलेले शिक्षक प्रशिक्षण आणि नर्सिंग अभ्यासक्रम.
नियमित पदवी आणि पदविका अभ्यासक्रम जसे की, वैमानिक, पायलट प्रशिक्षण, शिपिंग इत्यादी नागरी विमान वाहतूक महासंचालक,शिपिंग, संबंधित नियामक प्राधिकरणाद्वारे मंजूर अभ्यासक्रम.
परदेशातील या अभ्यासक्रमासाठी कर्ज दिल्या जाते
नोकरी देणारे व्यावसायिक अभ्यासक्रम, तांत्रिक पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी आणि एमसीए, एमबीए, एमएस, इत्यादी नामांकित विद्यापीठांद्वारे ऑफर केलेले पदविका अभ्यासक्रम.
सीआयएमए (Chartered Institute of Management Accountants) - लंडन, यूएसए येथे सीपीए (Certified Public Accountant) इत्यादींद्वारे चालवले जाणारे अभ्यासक्रम.
फी आणि इतर संबंधित खर्चाच्या 90% पर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. कर्जावरील व्याज हे कर्जाच्या रक्कमेनुसार आणि कालावधीनुसार ठरवले जाते.