MPL 2023: महाराष्ट्र प्रिमियर लीगचा थरार राज्यात तब्बल 11 वर्षानंतर क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Stadium) ही स्पर्धा होणार आहेत. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी, राजवर्धन हांगरगेकर हे स्टार खेळाडूही स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एकूण 6 संघ MPL मध्ये असून सर्व सामने मोबाइलवरूनही पाहता येतील. त्यासाठी Fancode हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.
फॅनकोड अॅप कोठे मिळेल?
Fancode हे लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रिमिंग अॅप आहे. (MAHARASHTRA PREMIER LEAGUE Live Matches) यावर तुम्हाला MPL क्रिकेट स्पर्धेचे सामने लाइव्ह पाहता येईल. तसेच MPL चे सामने डीडी स्पोर्ट्स (DD Sports) या चॅनेलवरून प्रेक्षकांना पाहता येतील. अँड्रॉइड मोबाइलमध्ये प्ले स्टोअरवरुन Fancode अॅप डाऊनलोड करता येईल. https://www.fancode.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही लाइव्ह मॅच पाहू शकता.
MPL मॅच लाइव्ह पाण्यासाठी शुल्क किती?
Fancode अॅपवर MPL ची एक क्रिकेट मॅच पाहायची असेल तर 19 रुपयांचा पास संकेतस्थळावरून ऑनलाइन खरेदी करावा लागेल.
MPL स्पर्धेच्या 19 सर्व मॅच पाहायच्या असतील तर 59 रुपयांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
महिना भराच्या सबस्क्रिप्शनसाठी 199 रुपये शुल्क आहे. तर वार्षिक सबस्क्रिप्शन 365 रुपयांमध्ये मिळेल.
वार्षिक पासमध्ये तुम्ही इतर राज्यांचे क्रिकेट लीग आणि स्पोर्ट्स सामने पाहू शकता. सध्या तमिळनाडू प्रिमियर लीगही जोरात सुरू आहेत. या मॅचही फॅनकोड अॅपवर पाहता येतील. सोबतच जगभरातील प्रमुख प्रिमियर लीगचे सामनेही लाइव्ह पाहता येतील.
MPL मधील सहा टीम्स कोणत्या?
पुणेरी बाप्पा: ऋतुराज गायकवाड
ईगल नाशिक टायटन्स: राहुला त्रिपाठी
कोल्हापूर टस्कर्स: केदार जाधव
छत्रपती संभाजी किंग्ज: राजवर्धन हांगरगेकर
रत्नागिरी जेट्स: अजिम काझी
सोलापूर रॉयल्स: विकी ओसवाल
MPL विजेत्या संघाला 50 लाख रुपये दर रनर-अप संघाला 25 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील दर्जेदार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून MPL मॅचेस क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. फक्त Fancode या अॅपवरच सर्व सामने लाइव्ह पाहता येतील. अॅपवरुन तुम्ही सामना अॅड्रॉइड टीव्हीवर कास्टही करू शकता. म्हणजेच मोठ्या स्क्रीनवर सामने पाहता येतील. मोबाइलमध्ये कास्टिंग असा पर्याय त्यासाठी दिलेला असतो.
Fancode अॅपवर कॉमेंट्री इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत असेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस असून पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात संध्याकाळी 8 वाजता सामना रंगणार आहेत.