Vodafone Idea: Vodafone Idea ने अजूनपर्यंत 5G सेवा सुरू केलेली नाही. यामुळेच 5G कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कंपनीने आपले अनेक ग्राहक गमावले आहेत. आपले ग्राहक परत मिळवण्यासाठी कंपनी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत आहे. या प्लॅनमुळे कंपनीला आपले ग्राहक परत मिळवण्यास मदत होऊ शकते. कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्त आणि अनेक फायदेशीर प्लॅन आणले आहेत. आता प्रत्येकाच्या जीवनात इंटरनेट डेटा महत्वाची भूमिका बजावते. नोकरी करणारा वर्ग, विद्यार्थी, गृहिणी आणि प्रत्येकालाच इंटरनेट डेटासोबत काम आहे. हीच बाब लक्षात घेऊन Vodafone Idea फक्त 17 रुपयांमध्ये मध्यरात्री अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे. तर जाणून घेऊया, या प्लॅन बाबत संपूर्ण डिटेल्स.
Vodafone Idea प्लॅन डिटेल्स
Vi चा 17 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन 24 तासांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. मात्र, या प्लॅनमध्ये फक्त डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला इतर कोणताही लाभ मिळत नाही. या प्लॅनमध्ये कोणतीही आउटगोइंग एसएमएस किंवा कॉल सेवा दिली जात नाही. तसेच, या प्लॅनमध्ये कोणतीही व्हॅलिडिटी किंवा कॉल सर्विस उपलब्ध नाही. म्हणजेच, जर तुम्हाला कॉल करायचा असेल किंवा एसएमएस पाठवायचा असेल तर तुम्हाला दुसऱ्या प्लॅनमधून रिचार्ज करावे लागेल.
व्होडाफोनचे इतर नाइट डेटा प्लॅन…
57 रुपयांचा प्रीपेड प्लॅन जास्तीत जास्त फायद्यांसह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 7 दिवसांची म्हणजेच 168 तासांची व्हॅलिडिटी मिळेल. हा प्लॅन सुद्धा नाइट प्लॅनच आहे. हा प्लॅन रात्री अनलिमिटेड डेटा सर्विस देते. म्हणजेच, 17 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत देखील, मोफत अनलिमिटेड डेटा देखील फक्त रात्रीसाठी उपलब्ध आहे. या नाइट प्लॅनचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होऊ शकतो, एखाद्या प्रोजेक्टवर रात्रीचे काम करत असताना इंटरनेटचा वापर करता येऊ शकतो.
Source : hindi.moneycontrol.com