BSNL Mobile Recharge Offer: सरकारी टेलिकॉम कंपनी(Govt Telecom Company BSNL) आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या ऑफर(Offer) घेऊन येत असते. 4G चा अभाव ही सध्या एकच समस्या कंपनीला आहे, पण, येत्या काही दिवसांत तेही दूर होणार आहे. हल्ली मोबाईल रिचार्ज प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाग झाले आहेत. ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेऊन 'BSNL' ने ग्राहकांसाठी नवीन प्लान ऑफर(New Plan Offer) आणली आहे. आम्ही तुम्हाला आज BSNL च्या 397 रुपयांच्या प्लानबद्दल सांगणार आहोत.चला तर या प्लानबद्दल जाणून घेऊयात.
BSNL च्या या प्लानमध्ये काय मिळेल?
- BSNL आपल्या ग्राहकांसाठी 397 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता दिली जात आहे
- यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा आणि दररोज 100SMS दिले आहेत
- देण्यात आलेल्या डेटा मर्यादेनंतर इंटरनेटचा स्पीड ४० केबीपीएस इतका कमी होईल
- BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग देखील दिले जाते
- ग्राहक लोकल, एसटीडी (ऑन-नेट आणि ऑफ-नेट) आणि नॅशनल रोमिंगमध्ये मोफत कॉलिंगचा आनंद BSNL च्या ग्राहकांना घेता येणार आहे
- दिल्ली आणि मुंबईतही (Mumbai) ग्राहकांना मोफत कॉलिंगचा लाभ घेता येईल
- मोफत डेटा आणि कॉलिंग व्यतिरिक्त, ग्राहकांना BSNL च्या या प्लॅनमध्ये लोकधुन कंटेंट आणि PRBT देखील मिळणार आहे
BSNL च्या या प्लानमधील गोम काय?
या प्लॅनची वैधता जरी 180 दिवसांची असली तरी उर्वरित सुविधा फक्त 60 दिवसांसाठीच मिळणार आहेत. थोडक्यात काय तर बीएसएनएलच्या(BSNL) या प्लॅनमध्ये ग्राहकांना नंबर सक्रिय ठेवण्यासाठी 180 दिवसांची वैधता मिळेल या प्रकरणात, इनकमिंग कॉल (Call) सुरू राहतील तसेच, कॉल, एसएमएस, डेटा आणि लोकधुन सामग्री यासारख्या सेवा फक्त पहिल्या 60 दिवसांसाठीच ग्राहकांना उपलब्ध होतील. त्यामुळे जर तुम्हाला फोन नंबर चालू ठेवण्यासाठी एखादा प्लॅन घ्यायचा असेल तर BSNL चा हा पर्याय नक्कीच तुम्हाला आवडेल.