Jio Plans : रिलायन्स जिओला स्वस्त प्रीपेड प्लानसाठी ओळखले जाते. सध्या मोबाईलचे रिचार्ज प्रचंड प्रमाणात महाग झाले आहेत असे असताना ग्राहकांची यासंदर्भातील गरज लक्षात घेऊन सर्वसामान्य लोकांना परवडतील असे 100 रुपयांच्या आतील प्लान jio ने आणले आहेत. जर तुम्हीही jio चे वापरकर्ते असाल तर 100 रुपयाच्या आतील हे प्लान्स नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग (Calling) , मोफत एसएमएस (free SMS) आणि इंटरनेटचा डेटा (Internet Data) उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
Jio चा15 रुपयाचा प्लान
जिओचा हा प्लान 15 रुपयाचा आहे. आपल्याला दैनंदिन प्लानमध्ये 1 GB, 1.5 GB, 2 GB असा कोटा मिळतो. मात्र हा कोटा संपल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा इंटरनेटची गरज भासते. 15 रुपयाचा हा खास प्लान अशाच लोकांसाठी बनविण्यात आला आहे. या डेटा अॅड ऑन प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 1 GB इंटरनेट डेटा मिळतो. जिओच्या या प्लॅनची वैधता तुमच्या बेस प्लॅनपर्यंत कायम आहे. हा जिओच्या प्लॅनवर डेटा अॅड आहे. मात्र या प्लानमध्ये तुम्हाला मेसेजिंगसाठी एसएमएसची (SMS) सुविधा मिळ णार नाही.
Jioचा 75 रुपयाचा प्लान
हा प्लान कमी डेटा वापरणाऱ्या जिओ युजर्ससाठी काढण्यात आला आहे. Jio चा 75 रुपयाचा प्लान हा कंपनीचा सर्वात स्वस्त आणि कॉलिंग रिचार्ज प्लान आहे. यामध्ये एकूण 23 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लानमध्ये, वापरकर्त्यांना दररोज 100 MB डेटा ऑफर केला जातो, तर 200 MB डेटा संपूर्ण वैधातेसह ऑफर केला जातो. या प्लानमध्ये डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड मर्यादा 64 kbps पर्यंत कमी होते.
यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. यासोबतच 50 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. जर आपण इतर फायद्यांबद्दल पाहायचे झाले तर, या प्लानमध्ये वापरकर्त्यांना मोफत डेटा आणि कॉलिंगसह Jio Tv , Jio Cinema , Jio Cloud आणि Jio Security चे फ्री सबस्क्रिप्शन (free subscription) मिळते आहे.
Jioचा 91 रुपयाचा प्लान
जिओच्या 91 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 0.1 GB डेटा मिळतो. याशिवाय कंपनी 200 MB अतिरिक्त डेटा देखील देते. एकूणच, जिओच्या या प्लानमध्ये 3 GB डेटा उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग (unlimited calling) आणि 50 मोफत एसएमएस (SMS) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.