Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Virat Kohli New EV Bike : विराट कोहलीला मिळालेली नवीन एम्पेरे प्रायमस इलेक्ट्रिक गाडी

Electric bike to virat kohli

Virat Kohli : ‘इलेक्ट्रिफ्लायिंग प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार म्हणून विराट कोहलीला एम्पेरे प्रायमस इलेक्ट्रिक गाडी मिळाली आहे. ग्रेव्हज इलेक्ट्रिक मोबालिटी कंपनीकडून गेल्या आठवड्यात ही गाडी लॉन्च केलीये. या निमित्ताने विराट कोहलीच्या गराज मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलरची सुद्धा भर पडलीये.

Virat Kohli :  आयपीएल मध्ये रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सामन्यातील सादरीकरणासाठी विराट कोहलीला मॅच ऑफ द प्लेयरने गौरविलं. यासाठी ग्रेव्हज इलेक्ट्रिक मोबालिटी कंपनीकडून गेल्याच आठवड्यात लाँच केलेली एम्पेरे प्रायमस ही इलेक्ट्रिक गाडी भेट दिली. ग्रेव्हज इलेक्ट्रिकने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमच्या थीमवरच खास एम्पेरे प्रायमस ही गाडी तयार केली आहे. यानंतर 10 एप्रिलला लखनऊ टीमसोबत झालेल्या सामन्यातील सादरीकरणासाठी मोहम्मद सिराजला सुद्धा एम्पेरे प्रायमसची गाडी भेट देत ‘इलेक्ट्रिफ्लायिंग प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित केलं.

ग्रेव्हज इलेक्ट्रिक कंपनी आणि आरसीबीचा (RCB) करार

आयपीएलच्या निमित्ताने ग्रेव्हज इलेक्ट्रिक कंपनी आणि आरसीबीचा टीममध्ये एक करार झाला आहे. या करारानुसार आरयीबीच्या प्रत्येक मॅचनंतर त्या टीमच्या एका खेळाडूला ‘इलेक्ट्रिफ्लायिंग प्लेअर ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरविलं जाणार आहे. यासाठी ग्रेव्हज कंपनीनं खास आरसीबीच्या थीम वर आधारित नवीन गाडीसुद्धा तयार केली आहे. या थीमची पहिली गाडी रविवारी विराट कोहलीला मुंबई इंडियन्स विरोधात झालेल्या सामन्यात उत्तम सादरीकरण केल्याच्या निमित्ताने भेट म्हणून दिली.

गाडी कशी बुक करता येईल

ग्रेव्हज इलेक्ट्रिक मोबालिटी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट (https://ampere.greaveselectricmobility.com/primus) वर जाऊन आपल्याला ही गाडी बुक करता येईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून या गाडीची बुकिंग सुरू झाली आहे. गाडीची बुकिंग अमाउंट आहे 499 रूपये. 1लाख 9 हजार 900 रूपये किंमतीची ही गाडी आहे. या गाडीमध्ये इतर रंगासोबत आरसीबीची स्पेशल कलर थीम असलेली गाडी आहे. पण या थीमची लिमिटेड एडिशन आहे. त्यामुळे तुम्ही जर आरसीबीचे चाहते असाल आणि इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार.

गाडीची वैशिष्ट्ये

या गाडीचा टॉप स्पीड 77 किमी असून 4.2 सेकंदामध्ये तब्बल 40 किमीच अंतर सहज पार करते. या गाडीमध्ये 48 व्होल्टची बॅटरी असून गाडी पूर्ण चार्ज करण्यासाठी 5 तास लागतात.