BCCI Media Rights: भारतीय क्रिकेट संघाच्या देशांतर्गत सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क Viacom 18 ने जिंकले आहेत. BCCI ने यासाठी लिलाव आयोजित केला होता. सर्वाधिक बोली वायाकॉम 18 ने लावल्याने पुढील पाच वर्षांसाठी (2023-28) हे हक्क रिलायन्स ग्रुपच्या माध्यम कंपनीकडे आले आहेत. सोनी आणि, डिस्नेस्टार या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
डिजिटल आणि टीव्ही या दोन्ही माध्यमांच्या प्रसारणाचे हक्क वायाकॉम 18 कडे आले आहेत. 5963 कोटी रुपये किंमत देऊन रिलायन्स ग्रुपने ही बोली जिंकली. आज गुरुवारी इ-लिलाव झाला. 2 ऑगस्ट रोजी Board of Cricket Control ने टेंडर जारी केले होते.
प्रती सामना 67 कोटी रुपये
या लिलावामध्ये पुढील 5 वर्षात भारतीय क्रिकेट संघाच्या भारतात (होम ग्राउंड) होणाऱ्या 88 सामन्यांचा समावेश आहे. डिजिटल प्रसारणासाठी 3101 कोटी रुपये म्हणजेच प्रति सामना ₹35.23 कोटी रुपये आणि टीव्हीवरील प्रसारणासाठी 2862 रुपये म्हणजे प्रति सामना 32.52 कोटी रुपये वायाकॉम 18 ने मोजले. म्हणजेच प्रत्येक सामन्यासाठी वायकॉम 18 ला 67.8 कोटी रुपये द्यावे लागतील.
यापूर्वी 2018 ते 2023 सालातील प्रसारणाचे हक्क डिस्ने स्टारकडे होते. त्यांनी प्रति सामना 60 कोटी रुपये बोली लावून लिलाव जिंकला होता. (BCCI Media Rights won by Viacom 18) यावर्षीच्या लिलावात प्रति मॅच 7 कोटी रुपयांनी जास्त किंमत BCCI ला मिळाली. सोनी स्पोर्ट्सकडे पुढील चार वर्षांसाठीचे (2024 पासून पुढे) ICC क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत.
लिलाव जिंकल्यानंतर BCCI चे सचिव जय शाह यांनी वायाकॉम 18 चे अभिनंदन केले. "BCCI चे टीव्ही आणि डिजिटल मीडिया हक्क पुढील पाच वर्षांसाठी जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारतीय क्रिकेटची भरभराट होतच राहील, असे ते म्हणाले.
पाच वर्षांसांठी हक्क रिलायन्सकडे
सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 पर्यंत प्रसारणाचे हक्क रिलायन्सकडे राहतील. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया भारतामध्ये सामने होणार आहेत. (BCCI Media Rights to Viacom 18) पाच वर्षांच्या कालावधीत 25 कसोटी सामने, 27 एकदिवसीय सामने आणि 36 T-20 सामने होणार होतील.
डिजिटल प्रसारणास टीव्हीपेक्षा जास्त किंमत
BCCI ने यावेळी पहिल्यांदाच डिजिटल प्रसारणाच्या हक्काचे मूल्य टीव्ही पेक्षा जास्त ठेवले होते. देशात डिजिटल माध्यमाचा प्रसार वाढत असल्याने टीव्ही प्रसारणापेक्षा जास्त महत्त्व डिजिटलला आले आहे. इंटरनेट स्ट्रिमिंगद्वारे सामने पाहणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे.