वंदे भारत ट्रेन हा सगळ्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय रेल्वेचे बदलते रूप या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. देशभरात वेगवगेळ्या राज्यात, वेगवगेळ्या शहरांना जोडणारी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु केल्या गेल्या आहेत. येत्या 15 ऑगस्टपर्यंत 75 ट्रेन सुरु करण्याचा सरकारचा विचार होता, मात्र एवढ्या कमी कालावधीत हा आकडा गाठणे अशक्य आहे. सध्या देशात 46 वंदे भारत ट्रेन सुरु आहेत.
वंदे भारत ट्रेनच्या प्रवाशी भाड्याबाबत प्रवासी खुश नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. विमानप्रवासाच्या बरोबरीने वंदे भारत ट्रेनचे दर असल्याने देशभरातील काही मार्गांवर 50% क्षमतेने ट्रेन धावत आहेत. महागड्या ट्रेन तिकिटामुळे सामान्य नागरिक साधारण ट्रेनने प्रवास करणे पसंत करत आहेत.
Indian Railways is reportedly considering reducing the fares of a few short-distance VandeBharat trains that register low occupancy. Railway officials stated that the fares for some VandeBharat trains would be reduced to attract more tourists#Timesnow@rohitsre @SmartDavangere pic.twitter.com/bV54oOjKXM
— South Western Railways Passengers Committee(SWRPC) (@NammaRailways) July 6, 2023
प्रवाशांच्या तक्रारी
यासोबतच वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणारे जेवण कच्चे, शिळे आणि बेचव असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. सोशल मिडीयावर देखील प्रवासी त्यांच्या तक्रारी लिहित असतात. जितके पैसे प्रवासी मोजत आहेत, त्याबदल्यात त्यांना आवश्यक ती सुविधा मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशातच केंद्र सरकारने देशभरात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या तिकीट दरांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचे हित लक्षात घेऊन त्यांना परवडेल असे तिकीटदर आकारले जाण्याची शक्यता आहे.
तसेच कमी प्रवासी संख्या असलेल्या वंदे भारत गाड्या लोकांसाठी अधिक व्यावहारिक बनवण्यासाठी रेल्वे भाडेकपात देखील करू शकते. इंदूर-भोपाळ, भोपाळ-जबलपूर आणि नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस या वंदे भारत गाड्यांसह इतर काही गाड्यांच्या भाड्याचा आढावा घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील वंदे भारत ट्रेन्स
महाराष्ट्रात सध्या 3 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. मुंबई ते शिर्डी, मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते गोवा. या तिन्ही मार्गांवर आधीपासून रेल्वे सेवा उपलब्ध होती. साधारण ट्रेनच्या तिकिटाचे दर आणि वंदे भारत ट्रेनच्या तिकिटाचे दर यामध्ये सरासरी 800-1000 रुपयांचा फरक असल्याने सामान्य नागरिक साधारण ट्रेनने जाणे पसंत करत आहेत. असे असले तरी या मार्गावर प्रवासी संख्या अधिक असल्याने तीनही ट्रेन पूर्ण क्षमतेने धावताना दिसत आहेत. नागपूर-बिलासपूर, इंदूर-भोपाळ आणि भोपाळ-जबलपूर या मार्गावर मात्र 50% पेक्षाही कमी प्रवासी संख्या असल्याने रेल्वे प्रशासनाकडून तिकीटदराबाबत आढावा घेतला जात आहे.