Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vande Bharat Express: लातूरकरांच्या कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार!

Vande Bharat Express

Image Source : www.marathi.abplive.com

Vande Bharat Express: सध्या चेन्नईमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जात आहे. मात्र यापुढे महाराष्ट्रातील लातूर येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव(Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे.

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस आणि वंदे भारत मेट्रोच्या माध्यमातून देशभरात रेल्वेचे जाळे निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या चेन्नईमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जात आहे. मात्र यापुढे महाराष्ट्रातील लातूर(Latur) येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express)  निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव(Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. हा कारखाना दोन वर्षापूर्वी सुरु झाला असून  कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही याठिकाणी होऊ शकलेली नाही. वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार असून लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली येथे वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केली जाणार आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव( Ashwini Vaishnaw) यांच्याकडून माहिती

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की, अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील 1272 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. नवी दिल्ली, कानपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अहमदाबाद आणि लखनऊ सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकासह पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि जयपूरमधील लहान मोठ्या रेल्वेस्थानकांचा देखील सरकार कायापलट करणार आहे.

पहिली हायड्रोजन ट्रेन

आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत स्वदेशी हायड्रोजन ट्रेनची सुरुवात डिसेंबर 2023 मध्ये करण्यात  येईल. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन असून कालका ते शिमला या हेरिटेड सर्किट मार्गावर पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. देशातील प्रमुख पर्यटन ठिकाणांवर ही ट्रेन सुरू करण्यात येईल. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामायण सर्किट, जगन्नाथ सर्किट, काशी विश्वनाथ सर्किट अशा अवघड मार्गांवर देखील भारत गौरव ट्रेन सुरू करण्यात येईल. या वर्षी बुलेट ट्रेनच्या कामावर जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती  रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.

लातूर रेल्वे कारखान्याची वैशिष्ट्ये काय?

लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर हा रेल्वे कारखाना आहे. 350 एकरवरील क्षेत्रापैकी 120 एकरवरील बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पहिला फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य होणार आहे. तर पहिल्या फेजमध्ये वर्षाला 250 कोच, दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेजमध्ये वर्षाला 700 कोच निर्मिती करणारा हा अवाढव्य कारखाना आहे.