Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vande Bharat ट्रेन 16 डब्यांऐवजी 8 डब्यांच्या छोट्या व्हर्जनमध्ये येणार? जाणून घ्या

Vande Bharat Train

Image Source : www.cntraveller.in

Vande Bharat Train: वंदेभारत ट्रेनचे तिकीट किमान 1600 ते 3000 रुपये इतके महाग असल्याने 2 - टीयर सिटी म्हणजेच एक लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरात आवश्यक प्रवासी मिळणे अतिशय कठीण जाणार आहे.

Vande Bharat Train: भारताची सेमी बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘वंदेभारत ट्रेनचे’(Vande Bharat  Train) लवकरच छोटे व्हर्जन येणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सध्या दरताशी 180 किमीच्या वेगाने धावण्याची क्षमता असलेली ही ट्रेन देशातील वेगवेगळ्या शहरामध्ये सुरु करण्यात येत आहे. या ट्रेनमध्ये सध्या 16 डबे आहेत मात्र भविष्यात या ट्रेनचे डबे कमी करण्याची रेल्वे मंत्रालयाची(Railway Mantralaya) योजना आहे. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

भारतातील पहिली वंदेभारत ट्रेन दिल्ली ते वाराणसी(Delhi to Varanasi) या मार्गावर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या आठ मार्गांवर वंदेभारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) सोलापूरसाठी वंदेभारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र या वेगवान वंदेभारत ट्रेनचे व्यवस्थापन करणे रेल्वेला थोडे जड जात आहे, असे उघडकीस आले आहे.

वंदेभारत ट्रेनचे तिकीट इतर ट्रेनपेक्षा महाग(Ticket is more expensive)

वंदेभारत ट्रेनप्रमाणेच भारतात अनेक अशा ट्रेन आहेत, ज्या जलद गतीने प्रवास करतात व उत्तम सुविधा देतात. राजधानी एक्स्प्रेस(Rajdhani Express) आणि जनशताब्दी(Jan Shatabdi) या त्यापैकीच एक. या दोन ट्रेनपेक्षा वंदेभारत ट्रेन ही प्रवासासाठी थोडी महागडी आहे. ही ट्रेन फायद्यात आणण्यासाठी रेल्वेला आर्थिक गणित जुळणे गरजेचे आहे. सध्या मोठ्या महानगरांना जोडणाऱ्या वंदेभारत ट्रेनला प्रवासी मिळताना अडचण निर्माण होत आहे. या ट्रेनचे तिकीट किमान 1600 ते 3,000 इतके आहे. तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या ते आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सध्या 16 ट्रेनचे डबे घटवून ते 8 डब्यांपर्यंत करण्याची रेल्वेची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. 
ही ट्रेन जर छोट्या शहरांना जोडायची असेल तर 16 डब्यांसोबत ती चालविणे रेल्वेला परवडणारे नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 2 टीयर शहरांना जोडणारी वंदेभारत 16 ऐवजी 8 डब्यांच्या स्वरूपात चालविण्याची रेल्वेची योजना आहे असे बोलले जात आहे.

लवकरच स्लिपरकोच येणार(Slipper coach will come soon)

संपूर्ण देशात 400 वंदेभारत ट्रेन चालू करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. ही ट्रेन सध्या चेअरकार(Chair Car) स्वरूपात असून या डब्यात बैठी आसन व्यवस्था आहे. दूरच्या प्रवासासाठी किंवा रात्रीच्या प्रवासासाठी ही ट्रेन योग्य नसल्याने आता लवकरच यामध्ये शयनआसनी म्हणजेच स्लीपरकोच(Slipper coach) तयार करण्यात येत आहे. वंदेभारत हा ट्रेन सेट असून त्याच्या दर दोन डब्यांनंतर मोटर बसवण्यात आली आहे. त्यामुळे वंदेभारतला लांबच्या पल्ल्यासाठी मेल-एक्सप्रेसप्रमाणे पुढे इंजिन जोडण्याची गरज नाही, ती मेट्रो किंवा लोकल प्रमाणेच चालते.