Vodafone Idea : Vodafone Idea (Vi)ने 99 आणि 128 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे. कंपनीने प्रत्येक युजर्सचा सरासरी महसूल (ARPU) वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. Vi गेल्या काही काळापासून ARPU वाढवण्यासाठी झगडत आहे. ग्राहकांना कितीही त्रास सहन करावा लागत असला तरी 99 रुपये आणि 128 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केल्याने Vi ला खूप मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे.
Vi कडे या दोन प्लॅनचा रिचार्ज करणारे अधिक ग्राहक आहेत. त्यामुळे 99 रुपयांच्या प्लॅनसाठी रिचार्ज करणार्या प्रत्येकाला आता अधिक वेळा रिचार्ज करावे लागेल. 99 रुपये आणि 128 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची नवीन व्हॅलिडिटी जाणून घेऊ. हे बदल सध्या फक्त मुंबईतील टेलिकॉम सर्कलमध्येच दिसून येणार आहे.
Vodafone Idea 99 रुपयांचा प्लॅन
99 रुपयांच्या प्लॅनची जुनी व्हॅलिडिटी 28 दिवसांची होती. मात्र आता तो 15 दिवसांवर येणार आहे. म्हणजेच प्लॅनचा एक दिवसाचा खर्च 3.53 रुपयांवरून 6.6 रुपये झाला आहे. या प्लॅनमध्ये आधी सारखेच फायदे मिळतील, तुम्हाला 200 MB डेटा, 99 रुपये टॉकटाइम आणि एसएमएस सुविधा मिळत नाही.
Vodafone Idea 128 रुपयांचा प्लॅन
मुंबईतील 128 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांवरून 18 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजेच या प्लॅनची एका दिवसाची किंमत 4.57 रुपयांवरून 7.11 रुपये झाली आहे. युजर्सना सर्व स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलसाठी 2.5 /सेकंद आणि 10 लोकल नेट नाईट मिनिटे मिळतात. या मिनिटांचा वापर रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेतच करता येतो. हा बदल फक्त मुंबईतच दिसणार आहे. त्यावर ग्राहकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी ही टेस्ट घेत असल्याचे सांगितले जात आहे.
99 आणि 128 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी कमी करण्यासोबतच, VI ने परवडणार्या रेंजतील काही जुने प्लॅन देखील काढून टाकले आहेत. 107, 111 आणि 279 रुपयांचे प्लॅन काढून टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर Vi ने 137 आणि 141 रुपयांचे STV (स्पेशल टॅरिफ व्हाउचर) देखील कमी केले आहे.
Source: hindi.moneycontrol.com