Covid Nasal Vaccine: भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापरण्याला केंद्र सरकार कडून मंजुरी देण्यात आली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीच्या नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या आपात्कालीन वापराला आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली. त्याअगोदर DGCI ने ही या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. ही लस आता कोविन (Cowin) ॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यांनी Covishield आणि Covaxin घेतले आहे ते लोकही ही लस घेऊ शकतात. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय कोविन ॲपवर (Cowin App) शनिवारी संध्याकाळीपासून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र अद्यापही कंपनीकडून या लसीची किंमत आणि वापरासाठी उपलब्धता जाहीर करण्यात आलेली नाही.
नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे काय?
इंजेक्शन न घेता नाकावाटे देण्यात येणारी कोरोनाची लस म्हणजे ‘नेझल कोरोना वॅक्सिन’ होय. ही लस त्वचेतून शरीरात प्रवेश करून विषाणू विरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करते. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना सुयांची भीती वाटते अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन हा एक उत्तम पर्याय आहे.
कोणत्या वयोगटातील लोकांना ही लास घेता येईल?
भारत बायोटेक कंपनीच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. ही नेझल कोरोनो वॅक्सिन खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना ही लस बूस्टर डोस म्हणून घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध करून देण्यात येईल.