व्हिडिओ शेअरिंग (Video Sharing)आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform)YouTube आता टीव्ही चॅनेल स्ट्रीमिंगची चाचणी करत आहे. या सेवेत YouTube जाहिराती देखील असतील असे कंपनीने सांगितले आहे.
GSM Arena या टेक-न्यूज-संबंधित वेबसाईटच्या मते, YouTube आता निरनिराळे टीव्ही शो, चित्रपट आणि संपूर्ण टीव्ही चॅनेल आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी प्रयत्नशील असून विविध सिनेमा कंपन्यांशी, टीव्ही चॅनलशी चर्चा करत आहे.
सध्या कंपनी काही निवडक YouTube ग्राहकांसोबत या सेवेची चाचणी घेत आहेत. YouTub व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्म सध्या दर्शकांची आवड समजून घेत आहे. जर सर्वकाही योजनेनुसार झाले तर, Google सेवा जाहिरात महसुलात 45 टक्के कपातीची मागणी करू शकते. विशेष म्हणजे, YouTube ची ही योजना निर्मात्यांसोबत झालेल्या कराराचाच एक भाग आहे.
याद्वारे YouTube ला आपल्या सेवा वाढविण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. अगदी अलीकडे, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने NFL Sunday Ticket सोबत करार केला आहे आणि या वर्षापासूनच हा चॅनल YouTube वर बघता येणार आहे.
सध्या YouTube Shorts वरील कंटेंट क्रियेटर सोबत कंपनी करार करू लागली आहे आणि त्यांना पैसे देखील दिले जाऊ लागले आहेत. TikTok ऍपची जागा भरून काढण्यासाठी YouTube मेहनत घेत आहे.