Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Transactions Hit Record : ऑक्टोबर महिन्यात UPIने केला नवा रेकॉर्ड, 12.11 लाख कोटींचे झाले व्यवहार

UPI, UPI Transaction, Digital Payment's

UPI Transactions Hit Record : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने गेल्या महिन्यातील डिजिटल व्यवहारांची माहिती दिली. गेल्या महिन्यात 678 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती. यानंतर पुढच्या महिन्याभरात सुमारे 72 कोटी इतके अधिक व्यवहार पार पडले आहेत.

युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयने ऑक्टोबर 2022 मध्ये विक्रमी व्यवहारांची नोंद केली आहे. या महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून तब्बल 730 कोटी व्यवहार पार पडले आहेत. याचे मूल्य 12 लाख 11 हजार कोटी इतके आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने गेल्या महिन्यातील डिजिटल व्यवहारांची माहिती दिली.  गेल्या महिन्यात 678 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती. यानंतर पुढच्या महिन्याभरात सुमारे 72 कोटी इतके अधिक व्यवहार पार पडले आहेत.

यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांच्या रकमेतही लक्षणीय वाढ होत आहे. 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा याच वर्षाच्या महिन्यात ओलांडला. सप्टेंबरमध्ये 11 लाख कोटी तर ऑक्टोबरमध्ये 12 लाख कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले आहेत. यासोबतच  इमिजिएट पेमेंट सव्‍‌र्हिस म्हणजे  ‘आयएमपीएस’ या ऑनलाइन आंतरबँक निधी हस्तांतरणाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात ४८.२५ कोटी व्यवहार पार पडले. या व्यवहारांचे मूल्य ४.६६ लाख कोटी रुपये इतके होते.

यूपीआय लोकप्रिय होण्याची कारणे (Reasons Behind UPI Popularity In India)

दसरा आणि दिवाळीमुळे गेल्या महिन्यात सणासुदीचा कालावधी होता. बाजारात खरेदीचा उत्साह होता. यामुळे एकूणच आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाली होती. ज्याचा परिणाम म्हणून यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर देखील आहे. यूपीआय हे व्यवहारसुलभ असल्याने अलिकडच्या काळात यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करण्याकडे कल वाढत आहे. ग्राहकांना पैसे तर सोबत ठेवावे लागत नाहीत, शिवाय कोणतेही कार्ड सांभाळण्याचीही गरज लागत नाही. हातात असलेल्या स्मार्टफोनच्या सहाय्याने हे व्यवहार करता येत असल्याने ही व्यवहारपद्धती अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. सध्या यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. हीबाबदेखील भारताला रोकडरहित अर्थव्यवस्थेच्या (कॅशलेस एकॉनॉमी) दिशेने नेण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.

फास्टॅग व्यवहारांमध्येही वाढ (FASTag toll collection touches Rs 4451.87 crores in Octobar 2022)

फास्टॅग देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर स्वयंचलित टोल संकलनाची सुविधा देते. फास्टॅगने सप्टेंबरमधील व्यवहारांच्या तुलनेत ऑक्टोबर 9.3%वाढ नोंदवली. सप्टेंबरमध्ये 28.3 कोटी व्यवहारांची नोंद झाली होती. याचे मूल्य 4244.76 कोटी रुपये इतके होते. तर ऑक्टोबर महिन्यात 4451.87 कोटी रुपयांचे संकलन झाले.