Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

व्हॉट्सॲपवरुन यूपीआय पेमेंट करताय, या 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घ्या

UPI

UPI Payments on WhatsApp : व्हॉट्सॲप वरुन पैसे पाठवणे हे आता मेसेज पाठवण्यासारखे सोपे आहे, यामध्ये आता वापरकर्त्यांना अजोडपणे यूपीआय वर आधारीत पेमेंट्स त्यांच्या चॅटवरुन एकाच ठिकाणावरुन करता येते. यासाठी तुम्हाला आता फक्त ‘₹’ या आयकॉनवर तुम्ही चॅट करतांना क्लिक करु शकता किंवा भारतातील २० दशलक्षांहून अधिक क्यूआर कोड वर आधारीत स्टोअर्स मध्ये क्यूआर कोड स्कॅन करुन यूपीआय पेमेंट करु शकतात.

तुम्ही तुमच्या स्थानिक किराणा मालाच्या दुकानातून काही वस्तू खरेदी केल्यानंतर किंवा आपल्या आप्तांकडून पैसे पाठवायचे किंवा घ्यायचे असल्यास,युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) मुळे
डिजिटली पेमेंट करणे खूपच सोपे झाले आहे.त्यामध्ये जर मेसेंजिंग ची सुविधा प्राप्त झाली तर आणखी सोयीचे होते. व्हॉट्सॲप हेच साध्य करत आहे,यामध्ये या दोन्ही गोष्टी या मंचावरुन करणे
शक्य आहे. व्हॉट्सॲप वरुन पैसे पाठवणे हे आता मेसेज पाठवण्यासारखे सोपे आहे, यामध्ये आता वापरकर्त्यांना अजोडपणे यूपीआय वर आधारीत पेमेंट्स त्यांच्या चॅटवरुन एकाच ठिकाणावरुन करता
येते. यासाठी तुम्हाला आता फक्त ‘₹’ या आयकॉनवर तुम्ही चॅट करतांना क्लिक करु शकता किंवा भारतातील २० दशलक्षांहून अधिक क्यूआर कोड वर आधारीत स्टोअर्स मध्ये क्यूआर कोड स्कॅन करुन
यूपीआय पेमेंट करु शकतात. (how to do UPI Payments on WhatsApp)

जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही परिचित चॅट इंटरफेस विंडोमधून काही सोप्या चरणांमध्ये तुम्ही व्हॉट्सॲप वर पेमेंट कसे सेट करू शकता ते खालीलप्रमाणे
आहे.

बँक अकाऊंटशी जोडणी करण्यासाठी तुम्हाला युपीआय सपोर्ट करणार्‍या भारतीय बँकेबरोबरच अकाऊंट कार्यरत करणे आवश्यक आहे. बँकेशी जोडण्यात आलेला फोन नंबर हा तुमच्या व्हॉट्सॲप नंबरशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.

  • तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे त्याचे चॅट ऊघडा आणि पेमेंट्स आयकॉन वर टॅप करा. त्यानंतर ॲटॅच वर टॅप करुन पेमेंट वर टॅप करा.
  • तुम्हाला जितके रुपये पाठवायचे आहेत ते लिहा. नंतर नेक्स्ट वर टॅप करा, त्यानंतर गेट स्टार्टेड वर टॅप करा.
  • बँकेच्या सूचीपैकी तुमच्या बँकेच्या नावावर टॅप करा.
  • व्हेरिफाय व्हाया एसएमएस वर टॅप करा. अलाऊ वर टॅप करा. जर व्हॉट्ॲप कडे जर फोन कॉल्स करण्याची व व्यवस्थापन करण्याची परवानगी असेल तर ती देण्याची गरज नाही.
  • तुम्हाला व्हॉट्सॲप वरुन पैसे पाठवायचे आणि प्राप्त करायचे आहेत त्या बँकेच्या अकाऊंटवर टॅप करा.
  • डेबिट कार्ड व्हेरिफाय करुन कंटिन्यू वर टॅप करा.
  • कार्डाचे डिटेल्स तपासण्यासाठी- व्हेरिफाय कार्ड वर टॅप करा.

दुसरा टप्पा- पैसे पाठवणे (Transfers Money)

  • तुम्ही व्हॉट्सॲपवर बँक अकाऊंट ॲड केल्यानंतर तुम्ही कोणत्याही काँटॅक्ट ला पैसे पाठवू शकता.
  • ज्या कॉन्टॅक्ट ला पैसे पाठवायचे आहेत त्याचे चॅट ओपन करा
  • ‘₹’ चिन्हावर टॅप करा (पेमेंट्स आयकॉन)
  • तुम्हाला जी रक्कम पाठवायची आहे ती प्रविष्ठ करा- नेक्स्ट वर टॅप करा- पैसे पाठवा. 

तिसरा टप्पा - युपीआय पिन टाकून तुम्ही पेमेंट व्हेरिफाय करा (Verify Payment)  

पैसे पाठवण्यापूर्वी तुम्हाला युपीआय पिन कन्फर्म करण्यास सांगण्यात येईल. जर तुम्ही युपीआय पिन अजूनही सेट केला नसेल तर तुम्हाला तो करायला सांगण्यात येईल, याकरता तुम्हाला डेबिट कार्डाचे शेवटचे सहा अंक आणि कार्ड संपण्याची तारीख टाकावी लागेल.

चौथा टप्पा- तुमच्या पेमेंटचे स्टेटस जाणून घ्या (Check Your Payment Status)

जर तुमचे पेमेंट यशस्वी झाले आहे किंवा नाही हे पहायचे असेल तर तुम्ही चॅटमध्ये जाऊन पैसे ट्रान्सफर झाल्याचे स्टेटस जाणून घेऊ शकता किंवा पेमेंट सेटिंग्ज मध्ये जाऊन मागील व्यवहार जाणून घेऊ शकता.

व्हॉट्सॲप कडून अनेक स्टिकर्स आणि बॅकग्राऊंड्सचा उपयोग करून तुमच्या आवडीनुसार पेमेंट अनुभव देऊ करण्यात आला आहे. या स्टिकर्स आणि बॅकग्राऊंड्सची निवड ही तुम्ही चॅट कॉम्पोझर मधील स्टिकर आयकॉन वर टॅप करुन करु शकता. व्हॉट्सॲप वरील पेमेंट्स विषयी अधिक माहितीसाठी https://www.whatsapp.com/payments/in येथे भेट द्या.