Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023: ग्राहकांसाठी खूशखबर! टीव्ही खरेदी होणार स्वस्त; महागड्या LCD TV च्या किंमतीही येतील खाली

Import Duty

Image Source : www.gizmochina.com

तुम्ही जर टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बजेट 2023 मध्ये सुट्या पार्ट्सवरी आयात शुल्क कमी केल्याने टीव्ही खरेदी स्वस्त होणार आहे. हाय एंड बजेट टीव्हींसाठी आणखी किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

Union Budget 2023: तुम्ही जर टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बजेट 2023 मध्ये सुट्या पार्ट्सवरी आयात शुल्क कमी केल्याने टीव्ही खरेदी स्वस्त होणार आहे. हाय एंड बजेट टीव्हींसाठी आणखी किंमत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एलसीडी, एलइडी टीव्ही खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. सर्व श्रेणीतील टीव्हींच्या किंमती 5% पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

कोणत्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केले(TV spare part import duty reduced)

भारतामध्ये अनेक आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे निर्मिती प्रकल्प आहेत. मात्र, त्यांना टीव्ही तयार करण्यासाठी लागणारे ओपन सेल पॅनल आयात करावे लागतात. सेल पॅनल म्हणजेच टीव्हीचे डिस्प्ले आणि त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स. हे पॅनल महाग असून टीव्ही निर्मितीमध्ये 60 ते 70% खर्च पॅनलचा असतो. केंद्र सरकारने बजेटमध्ये (BCD) बेसिक कस्टम ड्युटी 5% वरून 2.5 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

टीव्हीच्या किंमती 5% खाली येऊ शकतात? (TV prices may drop by 5%)

ओपन पॅनल डिस्प्ले आयातीसाठी कंपन्यांना मोठा खर्च करावा लागत होता. यावरील आयात शुल्क कमी झाल्याने टीव्ही निर्मितीच्या खर्चात 5% कपात होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. Consumer Electronics and Appliances Manufacturers Association (CEAMA) संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे देशांतर्गत टीव्ही निर्मिती तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्यातीलाही फायदा होणार आहे.

सोनी, पॅनासॉनिक कंपनीने सरकारच्या निर्णयाचे केले स्वागत

सोनी, पॅनासॉनिक कंपनीने सरकारच्या निर्णयाचे केले स्वागत केले आहे. अनेक टीव्ही निर्मिती कंपन्या आयात कपातीचा फायदा ग्राहकांना देतील. तसेच बाजारामध्ये निर्मिती कंपन्यांमध्ये स्पर्धा असल्याने किंमती कमी होतील. कोडॅक, थॉमसन, Blaupunkt आणि White-Westinghouse या टीव्ही ब्रँड्सची मालकी असलेली कंपनी Super Plastronic Pvt Ltd (SSPL) ने या निर्णयाचे स्वागत केले आहे. टीव्हींच्या किंमती 5% कमी होतील, असे कंपनीने म्हटले आहे. भारतामध्ये स्मार्ट टीव्ही निर्मितीमध्ये चिनी इतर जागतिक स्तरावरील कंपन्याचा वाटा आहे. चीनचा वाटा 38% आहे. तर इतर जागतिक कंपन्यांचा वाटा 40% आहे. भारतीय कंपन्यांचा वाटा फक्त 22 टक्के आहे.