Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023 : क्रीडा क्षेत्रासाठी बजेटमध्ये बंपर वाढ

Union Budget 2023

Image Source : www.crossbarriers.org.com

देशात विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात (Union Budget 2023) क्रीडा क्षेत्रासाठी (Sport Sector) सुद्धा तरतूद करण्यात येते. ह्या वर्षी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? ते पाहूया.

अर्थमंत्र्यांनी बुधवारी लोकसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला, जिथे त्यांनी एकामागून एक विविध क्षेत्रांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. यादरम्यान क्रीडा बजेटमध्ये (Sport Budget) मोठी वाढ करण्यात आली. यंदाच्या आशियाई खेळ आणि 2024 मध्ये होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिकला लक्षात घेऊन सरकारने क्रीडा मंत्रालयाला 3,397.32 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरकारने एकूण 723.97 कोटी रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 2,673.35 कोटी रुपये होती.

क्रीडा विकासाला सरकारचे प्राधान्य

क्रीडा मंत्रालयाच्या प्रमुख कार्यक्रम 'खेलो इंडिया'च्या बजेटमध्ये सरकारने बंपर वाढ केली आहे. देशातील क्रीडा विकासासाठी सरकारने 1,045 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 606 कोटी रुपये होती, त्यात 439 रुपयांची वाढ झाली आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यालाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खेलो इंडियाने देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिभा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या बजेटमध्ये एकूण 36.09 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावर्षी प्राधिकरणाला एकूण 785.52 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 749.43 कोटी रुपये होती. खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबिरे आयोजित करणे, खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि उपकरणे पुरवणे, ट्रेनर्स आणि प्रशिक्षक नियुक्त करणे सारखी जबाबदारी SAI ची आहे.

इतर संस्थांच्या वाट्याला किती रक्कम आली?

325 कोटी रुपये राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSFs) वाटप करण्यात आले आहेत. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) आणि जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सी (WADA) शी संलग्न राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा (NDTL) यांना आधी SAI कडून निधी दिला जात होता. पण आता त्याला क्रीडा मंत्रालयाकडून थेट निधी दिला जाणार आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात नाडाला 21.73 कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे, तर चाचण्या घेणाऱ्या एनडीटीएलला 19.50 कोटी रुपये मिळणार आहेत.

जगभरातील देश खेळाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि क्रीडा विज्ञान आणि खेळाडूंच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणावर अधिक लक्ष देत आहेत. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय क्रीडा विज्ञान व संशोधन केंद्रासाठी 13 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.