Nirmala Sitharaman Budget: काल जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रांवर होणारा खर्च तर जाणून घेतला आहे, पण तुम्हाला माहिती का यंदाच्या अर्थसंकल्पानुसार, शासनाव्दारे मंत्र्याचे वेतन, प्रवास खर्च व आदि गोष्टींवर किती खर्च करण्यात येणार आहे?
मंत्र्यांचे वेतन व इतर खर्चासाठी किती निधी? (How much Funds for Minister's Salary and Other Expenses)
2023 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शासन मंत्र्याचे वेतन, प्रवास खर्च, विदेशी विदेशी शासकीयसंबंधित व्यक्तींचा पाहुणचार, मनोरंजन, प्रवास खर्च व आदि गोष्टींवर 1, 258.68 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याची घोषणा केली. या तरतूदीमध्ये प्रशासकीय खर्च, माजी गव्हर्नरांच्या सचिवालय सहायतेचा खर्च, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, प्रधान वैज्ञानिक सल्लागारांचे कार्यालय, पंतप्रधान कार्यालयांचादेखील खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रीमंडळासाठी सर्वाधिक निधी(Maximum Funding for Union Cabinet)
या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. या मंत्रीमंडळासाठी सर्वात जास्त म्हणजे 832.81 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संसद अधिवेशनासाठी दिला जाणारा व्हीव्हीआयपी विमान प्रवासाचा खर्चाचादेखील यामध्ये समावेश असणार आहे. तसेच केंद्रीय कॅबिनेट व राज्यमंत्री यांचे वेतन, प्रवास व विदेशी शासकीय संबंधित लोकांचा खर्चसुध्दा यातूनच करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयासाठी 185.7 कोटी रूपये, प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयासाठी 96.93 कोटी रूपयांची, माजी राज्यपाल सचिवालय सहायतेसाठी 1.8 कोटी रूपये व मंत्रीमंडळ सचिवालयासाठी 71.91 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यलयासाठी किती रक्कम दिली? (How much for Prime Minister's office)
पंतप्रधान कार्यलयासाठी 62.65 कोटी रूपये इतका निधी अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आला आहे. विदेशी शासकीय संबंधित लोकांसाठी म्हणजे पाहुण्यांसाठी व मनोरंजनासाठी 6.88 कोटी रूपये देण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडून विदेशी लोकांचा पाहुणचार व मनोरंजनात्मक कार्यक्रम राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हे मनोरंजन कार्यक्रम व राष्ट्रीय दिनी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत-सोहळयावरदेखील खर्च करण्यात येणार आहे.