भारतात IPL नंतर WPL ने इतिहास रचायला सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने महिला क्रिकेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी डब्ल्यूपीएल (WPL) सारखी टुर्नामेंट सुरु केली आहे. याच महिला प्रीमियर लीगचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारीला) मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio Convention Center, Mumbai) मोठ्या दिमाखात पाड पडला.
या लिलावाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर खेळाडूंवर बोली लावण्यात आली. विशेष म्हणजे पाच फ्रेंचायजींसह महिला प्रीमियर लीगची (WPL 2023) सुरुवात करण्यात आली. या लिलावानंतर अनेक खेळाडू एका रात्रीत कोट्याधीश बनले असं म्हणायला हरकत नाही.
यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मांधना (Smriti Mandhana) हिच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लागली. तुम्हाला जर हा ऐतिहासिक ऑक्शन (WPL Auction 2023) पाहता आला नसेल, तर आजच्या या लेखातून फक्त 10 मुद्द्यांच्या साहाय्याने ही लिलाव प्रक्रिया समजून घ्या.
थोडक्यात पण महत्त्वाचे 10 मुद्दे
- प्रत्येक टीमच्या लिलावासाठी 12 कोटींची रक्कम देण्यात आली होती. म्हणजे एकूण 60 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार होते. लिलावाच्यावेळी यापैकी एकूण 59.50 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
- पाच फ्रेंचायजींनी मिळून 448 पैकी एकूण 87 खेळाडूंना विकत घेतलं. लिलावामध्ये एकूण 90 स्लॉट्स होते, त्यापैकी 3 रिक्त राहिले. एकूण 87 खेळाडूंमध्ये 30 परदेशी खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
- भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मांधना (Smriti Mandhana) हिच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) तिला 3.40 कोटी रुपयांना विकत घेतलं.
- सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत दोन परदेशी खेळाडूंचा समावेश झाला आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाची ऐश्ली गार्डनर (Gujrat Giants) आणि इंग्लंडची नॅट सिवर (Mumbai Indians) यांना 3.20 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहे.
- दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात जायंट्सने प्रत्येकी 18 खेळाडूंचा स्क्वाड तयार केला. तर यूपी वॉरियर्सने सर्वात कमी 16 आणि मुंबई इंडियन्सने 17 खेळाडूंचा स्क्वाड तयार केला.
- या लिलावात यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघानी त्यांना दिलेली 12 कोटी रुपयांची सर्व रक्कम खर्च केली. तर दिल्लीने 35 लाख रुपये वाचवले. बँगलोरने 10 लाख रुपयांची बचत केली आणि गुजरातला 5 लाख रुपये वाचवण्यात यश मिळाले.
- WPL च्या लिलावात 87 पैकी 20 खेळाडूंना 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली. या 20 खेळाडूंपैकी 10 खेळाडू हे भारताचे आहेत, 5 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे, दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू आणि इंग्लंडच्या 2 खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आलाय.
- WPL च्या पहिल्या लिलावात टॉप 20 खेळाडूंपैकी 11 ऑलराऊंडर्स खेळाडूंवर सर्वाधिक रक्कम खर्च करण्यात आली.
- विशेष म्हणजे पहिल्यांदा भारतातील T20 लीगमध्ये अमेरिकेचा खेळाडू खेळणार आहे. अमेरिकेची गोलंदाज तारा नॉरिसला (Tara Norris) 10 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतली आहे.
- WPL च्या लिलावात परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे 14, दक्षिण आफ्रिकेचे 4, इंग्लंडचे 7, न्यूझीलंडचे 2 खेळाडू समाविष्ट आहेत. याशिवाय वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा प्रत्येकी एक खेळाडू देखील आहे.