Career Options For Womens: जसा काळ बदलत आहे तसे करिअर चॉइसेसही बदलत आहेत. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. जे कोर्सेस, जॉब ऐकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात होते त्याला आता डिमांड राहिली नाही. महिलांना सध्याच्या काळात करिअरच्या अनेक नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. अनेक क्षेत्रांत महिला ठसा उमटवत आहेत. मात्र, शहरी आणि ग्रामीण भागात अद्यापही खूप मोठी तफावत आहे. पाहूया कॉलेज तरुणी आणि महिलांसाठी हटके मात्र, चांगला पैसा मिळवून देणारे करिअर ऑप्शन्स कोणते आहेत.
गेमिंग इंडस्ट्री
मागील काही वर्षांपासून गेमिंग क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी खुल्या होत आहेत. जर तुम्हाला या क्षेत्रात आवड असेल तर गेम आर्टिस्ट, डिझायनर, गेम डेव्हलपर, टेस्टर, अॅनिमेटर, व्हिज्युअल आर्टिस्ट, ऑडिओ इंजिनिअर, ट्रान्सलेटर, युआय डेव्हलपर अशा अनेक संधी आहेत. या पदांसाठी लाखोंच्या घरात पगारही दिला जातो. खास गेमिंग क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून कोर्सेस आणि पदवीची निवड केली तर या संधी पदरात पाडून घेता येतील.
एव्हिएशन क्षेत्र
एव्हिएशन क्षेत्र म्हटले की फक्त पायलट आणि फ्लाइट अटेंडंट(एअर होस्टेस) या संधींची चर्चा होते. मात्र, एव्हिएशन क्षेत्रात अशा अनेक संधी आहेत ज्यात महिला करिअर करू शकतात. एरोस्पेस इंजिनिअर, फ्लाइट इन्स्ट्रक्टर, एअर ट्रफिक कंट्रोलर, एअरक्राफ्ट मेंटनन्स टेक्निशियन, एअरपोर्ट मॅनेजर अशा अनेक संधी आहेत. एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील विविध कोर्सेस आहेत ज्याद्वारे महिलांना प्राधान्याने नोकरी दिली जाते.
STEM क्षेत्रातील संधी
महिलांसाठी STEM म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स क्षेत्रात अनेक संधी आहेत. इंजिनिअर, बायोकेमिस्ट, एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट, अँथ्रोपोलॉजिस्ट, स्टॅटिस्टिशियन, आर्कियॉलॉजीस्ट असे अनेक पर्याय आहेत.
युरोप, अमेरिकेत ‘वुनम इन STEM’ या संबंधी अनेक कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये सहभागी होऊन करिअरच्या संधींची माहिती मिळेल. अशा कार्यक्रमांतून महिलांसाठी जॉब, नेटवर्किंगची संधी मिळते. केंद्र सरकारचे सायन्स टेक्नॉलॉजी मंत्रालय देखील महिलांसाठी खास कार्यक्रम घेते. त्याद्वारे करिअरच्या नव्या संधी समजतील.
फोटोग्राफी
सोशल आणि डिजिटल मीडियाच्या प्रसारामुळे फोटोग्राफी क्षेत्राला डिमांड आली आहे. रिल्स, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करिअर म्हणून पुढे आले आहे. पूर्वी या क्षेत्राबद्दल जास्त माहिती नव्हती. मात्र, आता विविध कार्यक्रमांत या क्रिएटिव्ह फिल्डला डिमांड आली आहे. प्री-वेडिंग शूट, वेडिंग शूट, वाढदिवस आणि इतर खास कार्यक्रमावेळी फोटो आणि व्हिडिओग्राफर म्हणून फ्रिलान्स संधी मिळवता येतील. यातून स्वत:चा व्यवसायही उभा राहील. फोटोजर्नलिस्ट हा पर्यायही महिलांसाठी खुला आहे.
चित्रपट क्षेत्रातील संधी
अभिनय (अॅक्टिंग) सोडून महिलांसाठी चित्रपट क्षेत्रात इतरही अनेक संधी आहेत. सिनेमेटॉग्राफी, एडिटर, स्क्रीनप्ले रायटर, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, थ्री डी अॅनिमेटर, स्पेशल इफेक्ट अशा संधी आहेत. प्रोडक्शन टीममध्ये विविध कामाच्या संधी आहेत. साऊंड टेक्निशियन, कॉस्च्युम डिझाइनर, स्टोरीबोर्ड आर्टिस्ट, सिनिक डिझाइन मेकअप आर्टिस्ट अशा संधी आहेत. यासाठी देशभरात अनेक खासगी आणि सरकारी संस्था आहेत. तेथून कोर्स किंवा पदवी घेऊन या क्षेत्रात प्रवेश करू शकता.