Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UN's Report On India's GDP: भारताच्या विकासाबाबत संयुक्त राष्ट्रांनी दिली मोठी अपडेट, 'GDP' बाबत व्यक्त केला नवा अंदाज

Indian Economy

UN's Report On India's GDP: कोरोना संकटातून सावरलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत संयुक्त राष्ट्रांनी मोठी अपडेट दिली आहे. संयुक्त राष्ट्रांनी भारतीय अर्थव्यवस्थेची चालू वर्षात 5.8% या दराने वृद्धी होईल, असा सुधारित अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

जागतिक पातळीवर मंदीचे वातवरण आणि त्याचा भारताच्या निर्यातीवर झालेला परिणाम, रिझर्व्ह बँकेचे कठोर पतधोरण यासारख्या घटकांच्या भारताच्या आर्थिक वाढीवर परिणाम होईल, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी भारताचा विकास दराचा अंदाज  0.20% कमी केला आहे. वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी 5.8% इतका असेल, असा सुधारित अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. (UN Slash Indias GDP Forecast by 20 bps)

संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अॅंड प्रॉस्पेक्ट्स 2023 (UN's World Economic Situation and Prospects 2023 Report) नुसार भारताची विकासाची घोडदौडीचा वेग वर्ष 2022 च्या तुलनेत कमी राहील. यात जागतिक बाजारातील कमी झालेली मागणी आणि त्याचा निर्यातीला बसलेला फटका, गुंतवणूक कमी होणे,  रिझर्व्ह बँकेची व्याजदर वाढ या कारणामुळे विकासात अडथळे निर्माण होतील, असे म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022 मध्ये रेपो दरात एकूण 2.25% वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला. आरबीआयने आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षात जीडीपी 6.5% इतका राहील, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, भारतातील वाढत्या महागाईबाबत देखील संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. महागाई दर वर्ष 2023 मध्ये 5.5% इतका राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या याच अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वर्ष 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर केवळ 1.9% इतका राहील, असा सुधारित अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी संयुक्त राष्ट्रांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर वर्ष 2023मध्ये 3.1% इतका राहील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली. अनेक देशांत महागाईचा आगडोंब उसळला. परिणामी विकासाला ब्रेक बसल्याचे युनायटेड नेशन्सच्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

भारताच्या विकासाबाबत संयुक्त राष्ट्रांचा अहवाल काय सांगतो

  • संयुक्त राष्ट्रांनी भारताचा विकास दराचा अंदाज  0.20% कमी केला आहे.
  • वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी 5.8% इतका असेल, असा सुधारित अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.
  • रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022 मध्ये रेपो दर 2.25% ने वाढला. त्याचा परिणाम दिसून आला.
  • महागाईने उच्चांक गाठला. वर्ष 2022 मध्ये महागाई दर 6.7% इतका होता.
  • वर्ष 2023 मध्ये महागाईचा पारा खाली येईल. महागाई दर 5.5% इतका राहण्याचा अंदाज