टेस्लाचे एलन मस्क (Elon musk) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटर (Twitter) ही सोशल मीडिया कंपनी विकत घेतली. ट्विटर घेतल्यापासून त्यांनी नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. अलिकडे ट्विटरवर वारंवार काहीतरी बदल होत असल्याचं आपल्या वाचनात येतं. आता एका अहवालातून वेगळीच बाब समोर आलीय. ही बाब आहे एलन मस्क यांची आपल्याच फॉलोअर्सकडून (Followers) होणारी कमाई... आपल्या फॉलोअर्सकडून मस्क भरपूर पैसे कमवत आहेत. आपले जवळपास 24,700 सबस्क्रायबर्स आहेत. दर महिन्याला ते किमान 4 डॉलर देतात. म्हणजेच आपल्याकडच्या रुपयामध्ये 327.68 इतकी कमाई करून देतात.
Table of contents [Show]
मस्क यांचं पॅसिव्ह इन्कम
एंजल गुंतवणूकदार अॅलेक्स कोहेन यांनी याबाबत एक ट्विट केलंय. प्रत्येक क्लायंटनं त्यांना दर महिन्याला 4 डॉलर दिले. ट्विटरचे सीईओ एलन मस्क या माध्यमातून वर्षाला 1.2 दशलक्ष डॉलर पॅसिव्ह इन्कम कमवत असल्याचं त्यांनी ट्विट केलंय. आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं आणि लवकर निवृत्त होणं खरंच खूपच सोपं आहे, असं कोहेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. मस्क यांचे 136.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यांच्या फॉलोअर्सद्वारे ते दर महिन्याला किमान 98,800 डॉलर कमावत आहेत.
स्क्रीनशॉट केला शेअर
ट्विटरचे सीईओ मस्क यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केलाय. तिथं आपले 24,700 सबस्क्रायबर्स आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय. कंटेट क्रिएटर्स या प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शनसाठी अप्लाय करू शकतात. सेटिंगमध्ये मोनेटायझेशनवर टॅप करावं.
Content creators may wish to enable subscriptions on this platform.
— Elon Musk (@elonmusk) April 24, 2023
Just tap on Monetization in settings. pic.twitter.com/CmD06Mczmn
यूझर्ससाठी पर्याय
आपल्या यूझर्सना अधिक शब्दमर्यादा आणि व्हिडिओ ट्विट करण्यासाठी शुल्क द्यावं लागेल, असं या महिन्याच्या सुरुवातीलाच ट्विटरनं स्पष्ट केलं होतं. ट्विटरनं यासाठी तीन पॅकेज ऑफर केले. त्यातला एक निवडण्याचा पर्याय यूझर्ससमोर ठेवण्यात आला. त्यानुसार किंमत किंवा शुल्क ठरवलं जाणार, असं त्यात म्हटलंय.
पुढचे 12 महिने नाही घेणार पैसे
पुढचे 12 महिने आपण ट्विटर यूझर्सकडून पैसे घेणार नाहीत. ते त्यांच्याच कंटेंटमधून पैसे कमावतील, असं मस्क म्हणाले. 12 महिने पूर्ण झाल्यानंतर अॅन्ड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) शुल्क 15 टक्क्यांपर्यंत खाली येईल आणि कंपनी व्हॉल्यूमवर अवलंबून थोडीशी रक्कम जोडली जाईल. क्रिएटर्सना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, असंही एलन मस्क यांनी स्पष्ट केलंय.
ट्विटर आणि वाद
मागच्या काही दिवसांपासून म्हणजे ट्विटर घेतल्यापासून एलन मस्क चर्चेत आहेत. कर्मचारी कपात, कामाचे तास वाढवणं, ब्लू टिक व्हेरिफिकेशन आणि शुल्क अशा विविध कारणांनी ट्विटर आणि मस्क चर्चेत आहेत. ट्विटर घेणं ही चूक होती, असंही नुकतंच मस्क म्हणाले होते. सशुल्क टिकच्या निर्णयामुळे जगभरातले अनेक यूझर्स नाराज आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुल्क भरूनही टिक गायब झाल्यानं हा त्रास अनेकांना सहन करावा लागला. अमिताभ बच्चन यांनी टिकसंदर्भात ट्विट केलं. तर उद्योगपती अनुपम मित्तल यांची ब्लू टिक गायब झाल्यानं त्यांनीही जाहीर नाराजी व्यक्त करणारं ट्विट केलं. टेस्ला कार विकत घेण्याचं सध्या रद्द करत असल्याचं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं.