Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Viral Video : Elon Musk यांचे बॉडीगार्ड का होतायत सोशल मीडियावर व्हायरल 

Elon Musk

Image Source : www.aol.com

Viral Video : एलॉन मस्क या आठवड्यात अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को इथं एका खटल्याच्या सुनावणीसाठी गेले होते. तिथून बाहेर पडतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय. पण, तो व्हायरल होण्यामागचं कारण मजेशीर आहे. पाहूया…

टेस्ला (Tesla), ट्विटर (Twitter) आणि स्पेसएक्स (SpaceX) या कंपन्यांचे मालक आणि एके काळचे जगातले सगळ्यात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झालाय. 2018 मध्ये त्यांनी टेस्ला कंपनी संदर्भात केलेल्या एका ट्विटची सध्या शेअर बाजार नियामक बोर्डासमोर चौकशी सुरू आहे. त्यासाठी ते अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोला (San Francisco) साक्ष द्यायला गेले होते. तिथून ते बाहेर पडतानाचा एक व्हीडिओ आता व्हायरल झालाय. पण, चर्चा होतेय ती त्यांच्याबरोबर व्हीडिओत दिसणाऱ्या त्यांच्या बॉडीगार्डची.     

मस्क कोर्टातून बाहेर पडताना KTVU वृत्त वाहिनीने हा व्हीडिओ टिपलाय. आणि यात त्यांच्याबरोबर आहेत त्यांचे दोन बॉडीगार्ड किंवा शरीररक्षक. हे दोघं जुळे आहेत. आणि त्यांनी एकसारखी दाढीही ठेवलीय. बस्सं! हा व्हीडिओ व्हायरल होऊन या दोघांवर कमेंट्सचा पाऊस पडतोय.    

मस्क यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या टीममधल्या लोकांची नावं ते गुप्त ठेवतात. आताही बॉडीगार्ड्सची नावं समोर आलेली नाहीत. पण, लोक त्यांची तुलना अगदी गुप्तहेर खात्यातल्या अधिकाऱ्यांपासून नेव्ही सील्स तसंच अगदी लिओनेल मेस्सीशीही करतायत. तर काहींनी मस्क यांची तुलना आयर्नमॅनशी केलीय.     

इंटरनेटवरच्या काही भन्नाट प्रतिक्रिया पाहा,     

‘मला एलॉन मस्क यांचे बॉडीगार्ड्स हवेत. जर कधी गरज पडली तर मी यांनाच नेमेन.’   

‘हे एकमद आयर्नमॅन सारखं आहे!’   

‘मला असं समजलंय की, मेस्सीने ही पार्टटाईम नोकरी धरलीय. तो जगातला सर्वोत्तम शूटर आहे ना!’   

‘मस्क यांनी मेस्सीच्या वडिलांना बॉडीगार्ड म्हणून का ठेवलं?’   

‘बॉडी गार्ड असून दोघं एकाच दिशेनं बघतायत!’