Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अनिल अंबानींची मोठी सून क्रिशा शाहची(Khrisha Shah) एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Krisha Shah

Image Source : www.bollywoodshaadis.com

Khrisha Shah: क्रिशा शाह ही दिवंगत निकुंज शाह आणि नीलम शाह यांची कन्या आहे. निकुंज शाह हे निकुंज एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.

Khrisha Shah: उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी(Anil Ambani and Tina Ambani) यांचा मोठा मुलगा जय अनमोल अंबानीचा(Jai Anmol Ambani) मागच्याच वर्षी 20 फेब्रुवारी 2022 मध्ये क्रिशा शाहसोबत विवाह झाला. लग्नाअगोदर, जय अनमोल अंबानी आणि क्रिशा शाह यांचा डिसेंबर २०२१ मध्ये साखरपुडा झाला होता. या लग्न समारंभाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अनिल अंबानींची मोठी सून असलेली क्रिशा शाह नक्की आहे तरी कोण? तिचं शिक्षण काय आणि तिची एकूण संपत्ती किती याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया.

कोण आहे क्रिशा शाह?(Who is Khrisha Shah?)

मुंबईत जन्मलेली आणि वाढलेली क्रिशा ही एक सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक म्हणून आपल्या परिचयाची आहे. क्रिशा शाह ही दिवंगत निकुंज शाह आणि नीलम शाह यांची कन्या आहे. निकुंज शाह हे निकुंज एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. क्रिशाची आई नीलम शाह फॅशन डिझायनर आहेत. क्रिशाला एक मोठी बहीण नृती आणि एक मोठा भाऊ मिशाल शाह आहे.

क्रिशा शाहचं शिक्षण काय?(What is Khrisha Shah's education?)

एका रिपोर्ट्सनुसार, ख्रिशाने प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून(London School of Economics) सोशल पॉलिसी आणि डेव्हलपमेंटमध्ये पदवी पूर्ण केली आहे. तिने कॅलिफोर्निया विद्यापीठात(University of California) पॉलिटिकल इकॉनॉमिक्सचाही अभ्यास केला. क्रिशाने काही काळ ब्रिटनमधील ऍक्सेंचरमध्ये काम केले परंतु उद्योजक बनण्यासाठी ती भारतात परतली. तिने #Lovenotfea नावाने कोविड-19 संकटच्या काळात दरम्यान मानसिक आरोग्य समस्यांबाबत एक मानसिक आरोग्य मोहीम सुद्धा चालवली होती.

क्रिशाची एकूण संपत्ती किती?(What is Khrisha's net worth?)

क्रिशा 'क्रिएटिव्ह कोलॅबोरेशन, इंटरनॅशनल नेटवर्किंग आणि कम्युनिटी बिल्डिंग' या विषयात खास असलेल्या डिस्को(Dysco) या सोशल नेटवर्क कंपनीची संस्थापक आहेत. कंपनीच्या लिंक्डइन प्रोफाइलवरील माहितीनुसार, कंपनी व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असून ब्रँड ऑनलाईन आणि ऑफलाईन एकत्र आणणारा समुदाय आहे. एका रिपोर्ट्सनुसार, क्रिशाची एकूण संपत्ती 4 कोटी रुपये इतकी आहे.