Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nita Ambani Makeup Man Salary: तुम्हाला माहिती आहे का नीता अंबानी यांचा मेकअप मॅन कोण आहे व तो किती घेतो मानधन?

Nita Ambani Makeup Man

Image Source : http://www.rediff.com/

Nita Ambani: भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या स्टाइल व मेकअपची चर्चा नेहमीच होते. मात्र त्यांची ही स्टाइल व मेकअप कोण करतो, हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Nita Ambani Makeup Man: नीता अंबानी (Nita Ambani) व त्यांच्या कुटुंबाची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होते. त्यांची स्टाईल, मेकअप, कपडे, दागिने त्यांच्या प्रत्येक गोष्टी सोशल मिडीयावर व्हायरल होतात. त्यावर होणारा खर्चदेखील अतिरिक्त असतो. त्यामुळे सामान्य लोकांना या गोष्टींचे अप्रुप होते. पण तुम्हाला माहिती का, त्यांचा मेकअप कोण करतो व त्यासाठी तो किती मानधन आकारतो?

नीता अंबानी यांचा मेकअप मॅन कोण? (Who is Nita Ambani's Makeup Man)

नीता अंबानी यांच्या मेकअप मॅनचे नाव ‘मिकी कॉन्ट्रॅक्टर’ (Mickey Contractor) असे आहे. मिकी हे बाॅलिवुडमधील दिग्गज अभिनेत्रींचेदेखील मेकअप करतात. जसे की, करीना कपूर, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राॅय, अनुष्का शर्मा यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींचादेखील ते मेकअप करतात. मिकी कॉन्ट्रॅक्टर हे नीता अंबानी यांचे वैयक्तिक मेकअप आर्टिस्टदेखील आहे. ते विविध लग्नसोहळे व कार्यक्रमावेळी त्यांचा व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मेकअप करतात.

किती घेतात मानधन (How much do you Get Paid)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिकी कॉन्ट्रॅक्टर हे मुंबईत जर एखादा कार्यक्रम असेल, तर ते मेकअपसाठी साधारण 75,000 रुपये आणि इतर ठिकाणी 1 लाख रुपये इतके मानधन आकारतात. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी त्यांना मेकअप आर्टिस्ट बनण्याची प्रेरणा दिली. त्यांनी स्ट्रगलिंग डेजमध्ये हेलनचे केशभूषाकार म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी मिकी मुंबईतील प्रसिद्ध टोकियो ब्युटी पार्लरमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करीत होते.

मिकी यांना मिळालेले पुरस्कार (Awards Received by Mickey)

मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना मेकअपसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आज चित्रपटसृष्टीतील मेकअप क्षेत्रात त्यांचे एक मोठे नाव आहे. प्रसिद्ध चित्रपटांमधील अभिनेत्रींचा मेकअप करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. यामध्ये 'हम आपके है कौन', 'दिल तो पागल है', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'मोहब्बतें', 'माय नेम इज खान', 'कार्तिक' यांचा समावेश आहे. कॉलिंग'. 'कार्तिक', 'डॉन', 'वीरे दी वेडिंग', 'गुड न्यूज', 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटांचादेखील नावांचा समावेश आहे.