Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2022 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘टॉप 10 म्युच्युअल फंड’

top 10 mutual fund

Best Mutual Fund Invest in 2022 : ‘बेस्ट’ किंवा ‘टॉप’ या शब्दापासून सुरू होणारा इंटरनेटवरील कोणताही शोध तुम्हाला बेस्ट पर्याय देऊ शकत नाही. पण गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि रिस्कचा अंदाज घेऊन फंडची निवड करणे योग्य ठरेल.

अनेक नवीन गुंतवणूकदार इंटरनेटवर 'टॉप 10 म्युच्युअल फंड' शोधून त्या म्युच्युअल फंड (Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुरू करतात. बहुतेक नव्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे नेहमी एक प्रश्न विचारतात तो म्हणजे, कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकू? किंवा मला काही बेस्ट म्युच्युअल फंड कंपन्यांची नावं सांग! अशा बेस्ट नावांच्या यादीतूनच अनेक जणांची गुंतवणूक सुरू होते. पण अशा बेस्ट किंवा टॉप कंपन्यांच्या यादीमुळे गुंतवणूकदार आणखी गोंधळण्याची शक्यता असते. चला तर या बेस्ट आणि टॉप म्युच्युअल फंड कंपन्यांच्या यादीबद्दल अधिक समजून घेऊ.

इंटरनेटरवर रेडीमेड बेस्ट म्युच्युअल फंडची यादी शोधण्याच्या नादात नवीन गुंतवणूकदार प्रामुख्याने काही विशिष्ट प्रकारच्या वेबसाईट जातात. जिथे त्यांना अल्प-मुदतीच्या कामगिरीवर तयार करण्यात आलेल्या म्युच्युअल फंडांची यादी दिली जाऊ शकते. काहीवेळेस, एकाच कॅटेगरीतील स्कीम्स असण्याची शक्यता असू शकते. काही कंपन्यांच्या याद्या या चुकीच्या पद्धतीने लिस्ट केलेल्या असू शकतात. काही जण फक्त बेस्ट किंव टॉप कंपन्यांची नावे जाणून घेण्यासाठी इच्छुक असतात. ते त्याच्या व्यतिरिक्त इतर माहितीला तेवढे प्राधान्य देत नाहीत. असेही काही गुंतवणूकदार आहेत. जे खूप वर्षांपासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण ते ही बेस्ट आणि टॉप म्युच्युअल फंड जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

म्हणून आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीतील 2022 या वर्षासाठी टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांची यादी घेऊन आलो आहोत. या टॉप 10 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Fund) श्रेणीमधून मिडकॅप (Mid Cap), स्मॉलकॅप (Small Cap), काही आक्रमक हायब्रिड (Hybrid), लार्ज कॅप (Large Cap), आणि फ्लेक्सी कॅप योजना (Flexi Cap Scheme) आणल्या आहेत. ज्या कोणत्याही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारासाठी लागू होतील.


म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी टॉप 10 फंड

अ‍ॅक्सिस ब्लूचिप फंड (Axis Bluechip Fund)
मिराई अ‍ॅसेट लार्ज कॅप फंड (Mirae Asset Large Cap Fund)
पराग पारेख लॉंग टर्म इक्विटी फंड (Parag Parikh Long Term Equity Fund)
युटीआय फ्लेक्सी कॅप फंड (UTI Flexi Cap Fund)
अ‍ॅक्सिस मिडकॅप फंड (Axis Midcap Fund)
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड (Kotak Emerging Equity Fund)
अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप फंड (Axis Small Cap Fund)
एसबीआय स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund)
एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड (SBI Equity Hybrid Fund)
मिराई अ‍ॅसेड हायब्रिड इक्विटी फंड (Mirae Asset Hybrid Equity Fund)

रेडीमेड किंवा कोणत्याही टॉप 10 किंवा बेस्ट फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने काही सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत. गुंतवणुकीसाठी फंडची निवड करताना प्रत्येक कॅटेगरी पाहा. त्यानंतर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्ट करून, यातील जोखीम लक्षात घ्या आणि मगच गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडची निवड करा.

शेवटी ‘बेस्ट’ किंवा ‘टॉप’ या शब्दापासून सुरू होणारा इंटरनेटवरील कोणताही शोध तुम्हाला बेस्ट पर्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट, आवाका आणि रिस्क यांचा अंदाज घेऊन योग्य म्युच्युअल फंडची निवड करा. आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये नव्याने गुंतवणूक करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड सल्लागाराची मदत घ्यायला हवी.