प्रसिद्ध खेळाडू बनणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही; कारण त्या खेळाडुला प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसोबत अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. आज आपण स्पोर्टसच्या दुनियेतील धक्कादायक अशा महागड्या घटस्फोटांची माहिती घेणार आहोत. घटस्फोटांमुळे काही खेळाडुंनी आपली अर्ध्याहून अधिक संपत्ती गमावली आहे. यामध्ये माईक टायसन (Mike Tyson), टायगर वुड (Tiger Woods) आणि मायकेल जॉर्डन (Michael Jordan) यांच्या घटस्फोटांची चर्चा खूपच रंगली होती.
Table of contents [Show]
- कोबे ब्रायंट आणि व्हेनेसा (Kobe Bryant and Vanessa)
- टायगर वुड्स आणि एलिन नॉर्डेग्रेन (Tiger Woods and Elin Nordegren)
- रोमन अब्रामोविच आणि इरिना अब्रामोविच (Roman Abramovich & Irina Abramovich)
- मायकेल जॉर्डन आणि जुआनिटा जॉर्डन (Michael Jordan & Juanita Jordan)
- ग्रेग नॉर्मन आणि लॉरा अॅण्ड्रासी (Greg Norman & Laura Andrassy)
- लान्स आर्मस्ट्राँग आणि क्रिस्टिन आर्मस्ट्राँग (Lance Armstrong & Kristin Armstrong)
कोबे ब्रायंट आणि व्हेनेसा (Kobe Bryant and Vanessa)
घटस्फोटात खूप आर्थिक फटका सहन करावी लागणाही कोबे ही स्पोर्ट्समधील पहिली व्यक्ती नाही. कोबे आणि व्हेनेसा यांचे नाते बरेच दिवस टिकले होते. पण जेव्हा त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कोबे यांना व्हेनेसाला घटस्फोट दिल्यावर 360 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच त्यांच्या एकूण संपत्तीपैकी निम्मी संपत्ती द्यावी लागली होती. बहुतेक खेळाडूंचे घटस्फोट हे सेटलमेंटद्वारे 5-15 दशलक्ष डॉलर्समध्ये मार्गी लागतात. तर काही मूठभर खेळाडू असे आहेत; ज्यांना घटस्फोटासाठी 100 दशलक्षपेक्षा अधिक डॉलर्स मोजावे लागले आहेत.
टायगर वुड्स आणि एलिन नॉर्डेग्रेन (Tiger Woods and Elin Nordegren)
वर्ष : 2010
पे ऑफ मनी (Pay Off Money ) : 710 दशलक्ष डॉलर्स
महागाई भत्ता (Inflation) : 172 दशलक्ष डॉलर्स
गोल्फ लेजन्ट टायगर वुड्स आणि त्याची पत्नी एलिन नॉर्डेग्रेन 2010 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. क्रीडा इतिहासातील हा सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक आहे. टायगरला 172 दशलक्ष डॉलर्ससह त्याची माजी पत्नी एलिन नॉर्डेग्रेनला 710 दशलक्ष डॉलर्स इतकी मोठी रक्कम द्यावी लागली.
रोमन अब्रामोविच आणि इरिना अब्रामोविच (Roman Abramovich & Irina Abramovich)
वर्ष : 2007
पे ऑफ मनी (Pay Off Money ) : 300 दशलक्ष डॉलर्स
महागाई भत्ता (Inflation) : 2 दशलक्ष डॉलर्स
रोमन अब्रामोविच हा इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सीचा मालक आहे. शिवाय, तो एक व्यावसायिक सुद्धा आहे. 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर 2007 मध्ये त्याने पत्नी इरिनाला घटस्फोट दिला. इरिनाला पगार म्हणून 300 दशलक्ष डॉलर्स आणि महागाई भत्ता (Inflation) म्हणून 2 दशलक्ष डॉलर्स दिले होते.
मायकेल जॉर्डन आणि जुआनिटा जॉर्डन (Michael Jordan & Juanita Jordan)
वर्ष : 2006
पे ऑफ मनी (Pay Off Money ) : 168 दशलक्ष डॉलर्स
महागाई भत्ता (Inflation) : 58 दशलक्ष डॉलर्स
2006 मध्ये जुआनिटा जॉर्डनपासून वेगळी झाल्यानंतर, मायकेलने जुआनिटाला पोटगी म्हणून 168 दशलक्ष डॉलर्स दिले होते. याशिवाय महागाई भत्ता (Inflation) म्हणून त्याने 58 दशलक्ष डॉलर्स दिले होते. मायकेल जॉर्डन हा युनायटेड स्टेट्सकडून खेळणाऱ्या दिग्गज बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक होता. त्याने जुआनिटासोबत 16 वर्षे संसार केला होता.
ग्रेग नॉर्मन आणि लॉरा अॅण्ड्रासी (Greg Norman & Laura Andrassy)
वर्ष : 2007
पे ऑफ मनी (Pay Off Money ) : 103 दशलक्ष डॉलर्स
महागाई भत्ता (Inflation) : 32 दशलक्ष डॉलर्स
ऑस्ट्रेलियन उद्योजक आणि निवृत्त व्यावसायिक गोल्फ खेळाडू ग्रेग नॉर्मन याने पत्नी लॉरासोबत 26 वर्षे एकत्र घालवली. दोघेही 2007 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. त्यावेळी ग्रेगला 32 दशलक्ष डॉलर्स महागाई भत्त्यासह 103 दशलक्ष डॉलर्स पे ऑफ मनी द्यावा लागला होता.
लान्स आर्मस्ट्राँग आणि क्रिस्टिन आर्मस्ट्राँग (Lance Armstrong & Kristin Armstrong)
वर्ष : 2003
पे ऑफ मनी (Pay Off Money ) : 20 दशलक्ष डॉलर्स
महागाई भत्ता (Inflation) : 5 दशलक्ष डॉलर्स
लान्स आर्मस्ट्राँग 2003 मध्ये क्रिस्टिन आर्मस्ट्राँगपासून वेगळा झाला होता. त्यावेळी क्रिस्टिनने 5 दशलक्ष डॉलर्स महागाई भत्ता म्हणून तर पे ऑफ मनी म्हणून 20 दशलक्ष डॉलर्स घेतले होते. यामुळे लान्सचे बरेच आर्थिक नुकसान झाले होते. कारण त्यावेळी त्याच्याकडे फक्त 105 दशलक्ष डॉलर्स एवढीच रक्कम होती.