Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cryptocurrency Price Today: आजचा Cryptocurrency दर काय? Bitcoinच्या दरात किरकोळ वाढ!

Cryptocurrency Price Today

December 24, Cryptocurrency price: क्रिप्टो बाजारात चढ-उतार सुरुच आहे. बिटकॉईनच्या (Bitcoin) दरात किरकोळ वाढ दिसून आली आहे. तर, इथरियमचा (Ethereum) दर घसरला आहे. जाणून घ्या कोणत्या नाण्याच्या, काय किंमती आहेत.

Minor gain in Bitcoin price: आज बिटकॉईनच्या (Bitcoin) किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. तर महत्त्वाचे समजले जाणारे दुसरे नाणे इथरियमच्या  (Ethereum) दरात घट झाली आहे. तर 23 डिसेंबरला हिरो ठरलेले नाणे डॉजकॉईनने (Dogecoin) आज, 24 डिसेंबर रोजी मात्र लाल रंगात प्रवेश केला आहे. द टेरा क्लासिक (The Terra Classic) या नाण्याने मागील चोवीस तासांत सर्वाधिक 7 टक्के एवढी मोठी उडी घेत आपला दर वाढवला आहे. दुसरीकडे, सिंथेटीक्स (Synthetix) या नाण्याच्या दरात सर्वाधिक 2.90 टक्के एवढी घट नोंदवली गेली आहे. यावेळी जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 8121.79 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 0.29 टक्क्यांची घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.

आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today:

  • बिटकॉईन (Bitcoin): बिटकॉईनचा दर 16 हजार 848.61 युएस डॉलरवर 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ट्रेड करत होता. कॉईन मार्केट कॅपवरुन (CoinMarketCap) घेतलेल्या माहितीनुसार मागीत चोवीस तासांमध्ये या नाण्याची 0.01 एवढी किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.29 लाख एवढा आहे.
  • इथरियम (Ethereum): या नाण्याची किंमत 1 हजार 219.14 युएस डॉलरवर गेली आहे. मागील चोवीस तासात किंमतीत 0.43 टक्क्यांची घट झाली आहे.  वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात इथरियमची किंमत 1.04 लाख वरुन 1.03 वर गेली आहे.
  • डॉजकॉईन (Dogecoin): काल, 23 डिसेंबर रोजी सर्वाधिक वाढ नोंदवलेल्या या नाण्याची आज 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 0.07738 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागच्या चोवीस तासांमध्ये या नाण्यात 0.96 टक्क्यांची घसरण झाली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत  6.6588 रुपये एवढी आहे.
  • लाइटकॉईन (Litecoin): या नाण्याच्या दरात मागील चोवीस तासांत 1.19 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. सकाळी 10 वजता हे नाणे 65.67 युएस डॉलरवर ट्रेड करत होते.  या नाण्याची भारतात किंमत 5 हजार 600 एवढी आहे.
  • रिपल (Ripple): या नाण्याचा दर 0.3531 युएस डॉलर एवढा आहे. या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासात 1.12 टक्के एवढी वाढ झाली आहे. झीरएक्सनुसार  (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 29.7901  रुपये एवढी आहे.
  • सोलाना (Solana): मागील चोवीस तासांमध्ये 2.17 टक्क्यांची घसरण झाली आहे. या नाण्याची किंमत दोन दिवस सातत्याने घसरत आहे. या नाण्याची सकाळी 10 वाजता किंमत 11.77 युएस डॉलर एवढी नोंदवली गेली. याची भारतातील किंमत 1 हजार 26 एवढी आहे. 

मागील चोवीस तासांत या नाण्यांच्या दरात वाढ झाली आहे (Top crypto gainers today) -

अ.क्र. 

क्रिप्टो नाणे 

किंमत (सकाळी 10) 

मागील चोवीस तासांमधील वाढ 

1. 

द टेरा क्लासिक (The Terra Classic) 

0.0001459 युएस डॉलर 

7 टक्के  

2.  

डेसेंट्रलँड (Decentraland) 

0.3338 युएस डॉलर 

6.23 टक्के  

3.  

लिडो डीएओ ( Lido DAO

0.9495 युएस डॉलर 

3.98 टक्के 

4.  

क्रोनोस (Cronos) 

0.0591 युएस डॉलर 

2.17 टक्के 

5.  

ओसमोसिस ( Osmosis

0.741 युएस डॉलर  

2.09 टक्के