Crypto Scam: वनकॉईनचा सहसंस्थापक कार्ल सेबॅस्टियन ग्रीनवुड (Carl Sebastian Greenwood, Co-Founder OneCoin) याने क्रिप्टोमध्ये केलेल्या एक अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्याप्रकरणी युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने (US Department Of Justice) दोषी ठरवत त्याला कठोरात कठोर अशी 60 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
Cointelegraph या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, 16 डिसेंबर 2022 रोजी, डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने जाहीर केले आहे की, ग्रीनवुड याच्यावर मॅनहॅटन फेडरल कोर्टात (Manhattan Federal Court) फसवणूक, फसवणुकीचे कारस्थान आणि मनी लॉण्डरिंग (Money Laundering) प्रकरणी लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले आहेत. या प्रत्येक आरोपासाठी कोर्टाने 20 वर्षांची शिक्षा निश्चित केली आहे. म्हणजे, या 3 गुन्ह्यांसाठी ग्रीनवुडला 60 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.
यूएस ऍटर्नी डॅमियन विल्यम्स (US attorney Damian Williams) यांनी सांगितले की ग्रीनवुड यांनी केलेली फसवणूक ही आतापर्यंत झालेल्या सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक योजनांपैकी एक आहे. विल्यम्स यांनी OneCoin हे "Bitcoin किलर” असल्याचे अधोरेखित केले आहे.
OneCoin काय आहे?
OneCoin ही एक बल्गेरियन (Bulgarian) कंपनी असून, जी ग्रीनवुडने “क्रिप्टोक्वीन” रुजा इग्नाटोव्हा (Ruja Ignatova) याच्या मदतीने सुरू केली होती. त्याने त्याच नावाने क्रिप्टोकरन्सीचे मार्केटिंग केले होते. या घोटाळ्यातील प्रकरणामुळे इग्नाटोव्हाला जूनमध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या टॉप टेन मोस्ट वॉन्टेड यादीत टाकण्यात आले होते. रुजा इग्नाटोव्हा अजूनही फरार आहे. कंपनीने स्वतःची इमेज एक मार्केटिंग फर्म असल्याची तयार केली होती. ज्यामध्ये सदस्यांना OneCoin आणि इतर माईन केलेल्या पॅकेजेस विकण्याच्या बदल्यात कमिशन दिले जाते.
याशिवाय, डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या रिपोर्टमध्ये ग्रीनवुडने क्रिप्टोकरन्सी फर्मच्या "ग्लोबल मास्टर डिस्ट्रिब्युटर (Global Master Distributor)" या भूमिकेतून प्रत्येक महिन्याला अंदाजे $21.2 मिलियन डॉलर्सची कमाई केल्याचे म्हटले आहे. स्थानिक डिस्ट्रिक्ट जज एडगार्डो रामोस (Edgardo Ramos) हे 5 एप्रिल, 2023 या दिवशी ग्रीनवुडला शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.