• 07 Dec, 2022 08:27

Mahila Bachat Gat: महिला बचत गटाच्या माध्यमातून 'असा' मिळू शकतो रोजगार

Mahila Bachat Gat, Women Empowerment

Image Source : http://www.swachhindia.ndtv.com/

Women's Employment: महाराष्ट्रात बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय स्थापन झाले. त्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार मिळाला, त्यांचे जीवनमान सुधारले. तुम्हीही असेच काही व्यवसाय बचत गटाच्या मार्फत कर्ज घेऊन स्थापन करू शकता, कोणकोणते व्यवसाय स्थापन करू शकता त्याबाबत प्रेरणा आणि सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Mahila Bachat Gat: आपल्या घरी आजी नेहमी आपल्याला गोष्टी सांगत असते, मग त्यातून तिचा काळ आणि आता चालू असलेली स्थिती यात तुलना होते. आजीच्या काळात महिलांना ‘चूल आणि मूल’ इतकंच मर्यादित ठेवण्यात आल होत. पण आता तस नाही बदलत्या काळानुसार समाजात अनेक बदल घडून आले. मुलींच्या आयुष्यात तर खूप जास्त बदल घडून आले. कारण मुलींनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे आज कोणत्याही क्षेत्रात बघा मुली मागे नाहीत. महिलांना पुढे आणण्यासाठी सोई सुविधा सुद्धा भरपूर आहेत. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आपले करियर घडवले आहे. बचत गटाच्या माध्यमातून कसं रोजगार मिळवू शकता याबाबत सविस्तर माहिती घ्या या लेखातून. 

महिला आणि यश यातला दुवा The Link between Women and Success

महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहचणारा बचत गट हा महिला आणि सक्सेस यातला दुवा बनला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी अनेक व्यवसाय स्थापन केले, कोणी व्यावसायिक बनल्या तर कोणी मंजूर महिलांनीच एकमेकाला साथ देऊन आपले भविष्य उजेडात आणले. महिला बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक दोन्ही बदल घडून आले, महिलांना समाजात मनाचे स्थानही मिळाले आहेत. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांचे आयुष्य आधी मातीमोल झाले होते परंतु बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय उभा केला आणि उत्पन्न मिळवले. अशा अनेक महिलांचे उदाहरण तुमच्यासाठी पुढे दिले आहेतते समजावून घेऊन तुम्ही सुद्धा तुमचे आयुष्य बदलवू शकता. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बचत गट ही कल्पना पोहचली आहे. जास्तीत जास्त खेडे विभागातील महिला याच्या सदस्य आहेत. बचत गट स्थापन होण्याआधी त्याला नाव दिले जाते, त्याच नावाने त्याची नोंदणी होऊन पुढील काम चालते.
 
1 लाखाच्या गुंतवणुकीतून  80 महिलांना स्वयंरोजगार, महिन्याला 3 ते 7  लाख रुपये उत्पन्न 

महाराष्ट्रात(Maharashtra)अमरावती जिल्ह्यातिल वरुड तालुक्यात अनेक व्यवसाय चालतात, पण त्यापैकी सर्वांच्या लक्षात राहणारा व्यवसाय (Business) म्हणजे उन्हाळी कामांचा व्यवसाय. हा व्यवसाय महिला विकास मंच वरुड यांच्या मार्फत चालवला जातो. आयुष्याला सर्वात आधी 10 महिलानी मिळून हा व्यवसाय सुरू केला होता नंतर मेंबरशिप घेऊन अनेक महिला जुळल्या. या व्यवसायात 20 महिला पुरवठादार(supplier)म्हणून काम करतात, म्हणजेच त्या फक्त तालुक्यातील ऑर्डर घेऊन तिथे प्रॉडक्ट पोहचवून देतात. 10 महिला विविध ठिकाणी स्टॉल लावतात. 50 महिला स्वतः हाताने वाळवट बनवतात. म्हणजेच एकूण 80 महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यांच्याकडे शेवळ्या, पापड, वेगवेगळे पापड, चकल्या, त्याच बरोबर दिवाळीचे फराळ सुद्धा बनवतात. सीजननुसार त्यांच्या प्रॉडक्टमध्ये बदल होतात. त्यांची गुंतवणूक (investment) सुरवातीला 1 लाख रुपये झाली. गुंतवणुकीसाठी कर्ज घेतले. मशीन विकत घ्याव्या लागल्या, जागेचे भाडे द्यावे लागले त्यांचे मासिक उत्पन्न 7  लाखाच्यावर आहे यातून त्या सर्व महिलांना रोजगार प्राप्त झाला, प्रसिद्धी मिळाली. सर्वात महत्वाचे म्हणजे या व्यवसायात फक्त विधवा(widow), बेघर महिला आहेत. 

गुंतवणूक

उत्पन्न मासिक

महिला संख्या

1 लाख

 3 ते 7 लाख

80 महिला 

 

ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्रातून 40 मुलींना रोजगार 

बचत गटामध्ये 18 वर्षावरील मुलीसुद्धा सदस्य होऊ शकतात. नागपूर (Nagpur) जिल्ह्यामध्ये कचारी सावंगा या गावात बचत गटाच्या माध्यमातून मुलीनी कर्ज घेऊन ‘ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र’ (Beauty Parlor Training Centre)स्थापन केले. या व्यवसायमध्ये जवळपास आजूबाजूच्या गावातील मुली धरून 40 मुली काम  करतात. त्याच केंद्रामध्ये प्रशिक्षण घेऊन आपल्या गावात ब्युटी पार्लर स्थापन करून मुली रोजगार मिळवत आहे. खेडेभागात मुलींचे लग्न लवकर करण्यात येते, त्यामुळे त्यांना लवकरच कामाला लावतात. आयुष्यात कोणती वेळ कशी येईल ती माहित नसते म्हणून मुलींना स्वावलंबी असणे आवश्यक आहे. यांनी 50 हजाराची गुंतवणूक करून 40 मुलींना स्वयंरोजगार (Self Employed)मिळाला. 

बटाईने शेती करून मिळवले 3 एकर शेतीमध्ये 25 लाखाचे उत्पन्न 

नागपूर जिल्ह्यातील काटोल (Katol) येथे कृष्णाई बचत गटातील पुरुष आणि महिला यांनी 2 लाखाचे लोन घेऊन बटाईने शेती केली. सर्व काम वाटून घेऊन पुरुषांनी पेरणी आणि पिकांची काळजी घेतली. महिलांनी कापूस वेचणी आणि गवत काढणे ही कामे केली. 3 एकरमध्ये कापूस या पिकाची लागवड केली आणि त्यातून 25 लाखाचे उत्पन्न घेतले. लोन परत करूनही त्यांच्याकडे 22 लाख रुपये  शिल्लक राहले. त्यांचा बचत गटामध्ये सदस्य संख्या 15 इतकी होती. 15 लोकानी मिळून वर्षभर मेहनत करून तब्बल 25 लाखाचे उत्पन्न मिळवले. 

कम्प्युटर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून रोजगार आणि समाजसेवा 

अमरावती जिल्ह्यातील बेनोडा गावात ‘संस्कृती महिला बचत गटाने’ एक वेगळाच उपक्रम राबविला आहे. बचत गटाच्या माध्यमातून 5 लाखाचे लोन घेऊन गावात कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र (Computer Training Centre) स्थापन केले आहे. त्यांच्या बचत गटाची सदस्य संख्या 10 आहे. विविध कम्प्युटर कोर्स प्रत्येकाने वेगवेगळे घेऊन त्याचे प्रशिक्षण गावातील मुलांना देण्यात येत आहे. कोर्सची फी 3000 रूपयाच्या वर ठेवण्यात आली आहे. त्यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास 70 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. 

बचत गटाच्या माध्यमातून असे अनेक व्यवसाय आहेत ज्यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. तुम्ही सुद्धा असे व्यवसाय स्थापन करून स्वावलंबी होऊ शकता.सॅनिटरी नॅपकिन,  बेन्टेक्स ज्वेलरी,  गारमेंट्स, ब्युटी पार्लर, केटरिंग, फॅशन डिझायनिंग, लोणचे पापड, साडी, दिवाळी फराळ, बुक स्टॉल इत्यादि व्यवसाय करूनही अनेक महिलांना रोजगार मिळत आहे.