IT programmers Jobs: भारतातील बहुतेक आउटसोर्स प्रोग्रामर येत्या दोन वर्षांत त्यांच्या नोकऱ्या गमावतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे, बहुतेक आउटसोर्स कोडर त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, कारण सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी भविष्यात खूप कमी लोकांची आवश्यक असेल, असे मत सुप्रसिद्ध आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी स्टॅबिलिटी एआयचे सीईओ इमाद मोस्ताक यांनी व्यक्त केले.
Table of contents [Show]
AI चा विविध नोकऱ्यांवर परिणाम
'मला वाटते की Artificial Intelligence (AI) याचा विविध प्रकारच्या नोकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होईल. (AI) चा प्रत्येकावर समान परिणाम होणार नाही, कारण प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. त्याचा परिणाम फ्रान्ससारख्या देशांवर कमी होईल, जेथे कामगार कायदे अतिशय कडक आहेत', असे मत स्टॅबिलिटी एआयचे सीईओ इमाद मोस्ताक यांनी मांडले.
भारतातील नोकऱ्यांवर होईल परिणाम
'भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आउटसोर्स केलेले कोडर म्हणजे कोडींग प्रोग्रामिंग करण्यास आज ज्यांना नोकरीवर ठेवले आहे ते लोक (लेव्हल 3 प्रोग्रामर पर्यंत) एक किंवा दोन वर्षात त्यांच्या नोकऱ्या गमावतील, तर फ्रान्समध्ये तुम्ही प्रोग्रामिंग डेव्हलप करणाऱ्याला कधीही नोकरीवरुन काढून टाकू शकणार नाही. AI चा वेगवेगळ्या देशांवर आणि वेगवेगळ्या क्षेत्रांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होईल, असे सीईओ इमाद मोस्ताक म्हणाले.
आउटसोर्स कंपन्यांसाठी भारत मुख्य ठिकाण
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारतात 5 दशलक्षाहून अधिक सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहेत, ज्यांना ChatGPT सारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) साधनांमुळे धोका आहे. परदेशात बॅक ऑफिस जॉब आणि संबंधित तांत्रिक कामांसाठी आउटसोर्स करणार्या कंपन्यांसाठी भारत हे एक प्रमुख पुरवठा करणारे ठिकाण आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या, यूएस बँका, एअरलाइन्स ते किरकोळ विक्रेते, सर्व भारतातील आउटसोर्सिंग कंपन्यांचे ग्राहक आहेत.
TCS देणार प्रशिक्षण
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही देशातील सर्वात मोठी आउटसोर्सिंग कंपनी आहे. इतर आउटसोर्सिंग कंपन्यांमध्ये विप्रो आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे. टीसीएसने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर मोठा दाव लावला आहे. ग्राहकांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मदत करण्यासाठी कंपनी आपल्या 25,000 अभियंत्यांना प्रशिक्षण देणार आहे.
AI मुळे अनेक प्रश्न निर्माण
मोस्ताक म्हणाले की,'तुम्हाला कोड लिहिण्याचे काम का दिले जाईल, जेव्हा संगणक तुमच्यापेक्षा चांगले कोड लिहू शकतो. तसेच, या प्रक्रियेत सर्वकाही स्वयंचलित होणार नाही. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे को-पायलटही असतील. याचा अर्थ निव्वळ प्रोग्रामिंगसाठी कमी लोकांची आवश्यकता असेल, परंतु इतर सर्व गोष्टींसाठी कोडर आवश्यक असतील का? हा खरा प्रश्न आहे आणि हा समतोल आपण समजून घेतला पाहिजे, कारण विविध क्षेत्रांमध्ये परिणाम भिन्न असू शकते.