काही दिवसांपासून, सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे क्रिप्टोकरन्सी चहा (Cryptocurrency tea). त्याच्या चर्चेमागील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रिप्टोकरन्सीने जगभरातील अनेक लोकांना रातोरात करोडपती आणि अब्जाधीश बनवले आहे. पण तरीही त्याचा वापर अजूनही अनेक देशांमध्ये वैध नाही आणि यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. चहा विक्रेत्यांच्या अनेक कथा आपण ऐकल्या, वाचल्या आहेत. अलीकडे अनेक चायवाल्यांनी आपली दुकाने उघडली आहेत. कुणी एमबीए चायवाला (MBA chaiwala), कुणी पदवीधर चायवाला (Graduate chaiwala). अशा अनेक व्हायरल कथा वाचल्या, ऐकल्या असतील.
पेमेंट साठी क्रिप्टोकरन्सीचा पर्याय (Cryptocurrency for payment)
आम्ही तुम्हाला सांगतो की या देशातील प्रत्येकजण चहा पिण्याचे शौकीन आहे. चहाचा ब्रँड वेगळा असू शकतो, पण चहा हा बहुतेकांचं आवडीचं पेय आहे. आता आम्ही ज्या चहा विक्रेत्याची गोष्ट सांगणार आहोत ती या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. हा चहा विक्रेता बंगळुरूमध्ये राहतो. बंगळुरूमधील एक चहा विक्रेता चहाचे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये घेतो या कारणासाठी प्रसिद्ध झाला आहे.
हर्ष गोएंका यांनी घेतली दखल (Harsh Goenka took notice)
शुभम सैनी हा या चहाच्या स्टॉलचा मालक आहे. त्याच्या दुकानाचे नाव फ्रस्ट्रेटेड ड्रॉपआउट असे नाव आहे. लोकांना त्याची क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट घेण्याची भन्नाट पद्धत आवडली आहे. एवढच काय तर प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सुद्धा त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक छायाचित्र शेअर करत "हा नवीन भारत आहे" अशी समर्पक ओळ देखील लिहिली आहे. शुभम सैनी या चहावाल्याने ग्राहकांकडून पेमेंट स्विकारण्यासाठी पेटीएमचा क्यूआर कोडही बसवला आहे. जेणेकरून ग्राहक ऑनलाइन पेमेंट करु शकतील. पण यासोबतच त्याच्या चहाच्या स्टॉलवर एक छोटासा काळ्या रंगाचा बोर्ड आहे ज्यावर असे लिहिले आहे की, येथे क्रिप्टो देखील स्विकारले जातील.
नेटकऱ्यांना आवडली कल्पना (Netizens liked the idea)
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांना शुभम सैनीची ही कल्पना आवडली असून त्यांनी ट्विटरवर त्याबाबत ट्विट केले आहे. हर्ष गोएंका यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ट्विट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. या ट्विटवर लोक विविध कमेंट करत आहेत. पैकी एकाने ट्विट केले आहे की, ‘ही खूप वेगळी कल्पना आहे’. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘खूप अद्भुत’.