• 07 Dec, 2022 08:37

OLA S1 and S1 Pro Electric Scooters: सॉफ्टवेअर अपडेटनंतर ओलाच्या स्कूटरमध्ये ॲड होणार "हे" फीचर्स

OLA S1 and S1 Pro Electric Scooters: सॉफ्टवेअर अपडेटनंतर ओलाच्या स्कूटरमध्ये ॲड होणार "हे" फीचर्स

Image Source : https://olaelectric.com/

OLA: OLA S1 आणि S1 Pro या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरसाठी Move OS3 सॉफ्टवेअर अपडेट करत आहे. नवीन सॉफ्टवेअर आपल्यासोबत अनेक नवीन वैशिष्ट्ये घेऊन येणार आहेत. यंदाच्या दिवाळीतच ओला इलेक्ट्रिकने याची घोषणा केली होती. यामध्ये कोणकोणते नवीन फीचर्स समाविष्ट होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

OLA Electric Scooter software update: ओला इलेक्ट्रिक आपल्या ग्राहकांसाठी नवीन सॉफ्टवेअर अपडेट करत आहे. कंपनी S1 आणि S1 Pro या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरसाठी Move OS3 सॉफ्टवेअर अपडेट करत आहे. नवीन सॉफ्टवेअर आपल्यासोबत अनेक नवीन वैशिष्ट्ये घेऊन येणार आहे. यावर्षीच्या दिवाळीला ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी लवकरच नवीन सॉफ्टवेअर अपडेट आणणार असल्याची घोषणा केली होती. ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मूव्ह ओएस 3 च्या बीटा सिरीजच्या रोल आउटची घोषणा केली आहे. ओला S1 स्कूटरसाठी Move OS3 सॉफ्टवेअर तयार झाले आहे.  OLA ने 25 ऑक्टोबर रोजी Move OS3 साठी साइन अप केले.

सॉफ्टवेअर अपडेटनंतर ओलाच्या स्कूटरमध्ये ॲड होणार पुढील फीचर्स 

  • अनलॉक सिस्टम 
  • 15 मिनिटांत 50KM पर्यंत रिचार्ज करा 
  • ऑटो-रिप्लाय फीचर्समध्ये एंट्री

15 मिनिटांत 50KM पर्यंत रिचार्ज करा

लांबच्या प्रवाशांसाठी, ओलाने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये Move OS 3 मध्ये हायपरचार्जिंग वैशिष्ट्ये प्रेझेंट  केली आहेत. याचा वापर करून, ओला इलेक्ट्रिक स्कूटर ओलाच्या हायपरचार्जरचा लाभ घेऊ शकते आणि अवघ्या 15 मिनिटांत 50 किमीपर्यंत रिचार्ज करू शकते. ओलाकडे सध्या जवळपास ५० हायपरचार्जर्स आहेत, जे इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्क्रीनवर दाखवले जातील.

अनलॉक सिस्टम 

Ola ने ऑगस्ट 2021 मध्ये S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करताना या वैशिष्ट्यांचे वचन दिले होते. ओलाने MOVE OS3 मध्ये प्रेझेंट  केलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची अनलॉक सिस्टिम , जी स्कूटरला आपोआप अनलॉक आणि लॉक करण्यात मदत करते. हे ड्रायव्हरला पासकोड न टाकता किंवा अॅप्लिकेशन न उघडता स्कूटर सुरू करण्यास मदत करेल.

ऑटो-रिप्लाय फीचर्समध्ये एंट्री

Ola ने पार्टी मोड सारखे इतर फीचर्स देखील प्रेझेंट केले आहेत. यामुळे स्कूटरवर वाजणाऱ्या गाण्याच्या टोनसोबत स्कूटरचे लाईट सिंक होण्यास मदत होते. Move OS 3 च्या मदतीने, ग्राहकांना आता डिस्प्लेवरील कॉल अलर्टसह ऑटो-रिप्लाय फीचर्समध्ये सुद्धा एंट्री मिळेल. ओला इलेक्ट्रिकनेही सॉफ्टवेअर अपडेट करून स्कूटर्स वेगवान केल्या आहेत. स्पोर्ट्स मोड आणि हायपर मोडमध्ये प्रवेग सुधारण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.