खेळ कुठलाही असो,खेळाच्या चाहत्यांना तोटा नाही. विरंगुळा म्हणून, आवड म्हणून किंवा शारीरिक व्यायाम म्हणून अनेकजण खेळ खेळतात. आता क्रिकेटसारखे कबड्डी, फुटबॉल, हॉकी हे खेळ देखील भारतात प्रसिद्ध होऊ लागले आहेत.
हेच सगळे बदल लक्षात घेऊन खेळाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्केट देखील दिवसेंदिवस विस्तारत चाललं आहे. एकदा की खेळात नाव कमावलं की पैसा आणि प्रसिद्धी खेळाडूच्या मागे धावतेच धावते.
आजच्या या लेखात आपण अशाच काही जगप्रसिद्ध खेळांची माहिती घेणार आहोत, ज्यांच्या सामन्यांमध्ये करोडोंची उलाढाल होत असते. तुम्ही जर स्पोर्ट लवर असाल तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे. फॉर्ब्सने जाहीर केलेल्या अहवालानुसार टॉप 5 खेळांच्या सामान्यांची माहिती आम्ही येथे देत आहोत, ज्यामध्ये खेळणारे खेळाडू देखील करोडोंचे मानधन घेतात आणि मोठी आर्थिक उलाढाल होते.
आता तुम्ही म्हणाल की एवढी मोठी आर्थिक उलाढाल होत असेल तर त्यासाठी खेळाचा निकष काय असतो? उत्तर सोपं आहे. खेळाची लोकप्रियता आणि दर्शकसंख्या. याच आधारावर सामन्यांना जाहिराती मिळतात आणि त्यातून ते महसूल कमवतात. जगातल्या सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या क्रीडा सामन्यांत IPL देखील आहे हे विशेष! चला तर जाणून घेऊयात संपूर्ण लिस्ट
Table of contents [Show]
नॅशनल फुटबॉल लीग (National Football League)
नॅशनल फुटबॉल लीग (NFL) ही अमेरिकेत खेळला जाणारा प्रचंड लोकप्रिय सामना आहे. फुटबॉल क्षेत्रातील जगातील सर्वाधिक पसंतीची ही लीग आहे. तसेच व्यावसायिक पातळीवर देखील या खेळाची सर्वाधिक उलाढाल होत असते. दरवर्षी 18 आठवडे फुटबॉल लीगचे सामने चालतात. प्रत्येक सामन्यांत जवळपास 36 दशलक्ष डॉलरची म्हणजेच 281 कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
Josh Harris, the private equity billionaire, is nearing an agreement to buy the US National Football League’s Washington Commanders. https://t.co/t1pHpYsYkM pic.twitter.com/NpkynnnKto
— Financial Times (@FinancialTimes) April 13, 2023
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)
क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ जरी नसला तरी क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे भारतातच आहे हे काही वेगळं सांगायला नको.
भारतात दरवर्षी भरणारी IPL टुर्नामेंट जगातली सर्वात लोकप्रिय क्रिकेटची टुर्नामेंट आहे. आयपीएलच्या 2022-2027 साठीचे स्ट्रीमिंगचे हक्क नुकतेच तब्बल 48,000 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
हे सामने तब्बल दोन महिने चालतात. IPL मध्ये 10 क्रिकेट टीम उरतल्या असून टुर्नामेंटमधील प्रत्येक सामन्यांत $15.1 दशलक्ष म्हणजेच 117 कोटी रुपये इतकी प्रचंड उलाढाल होते.
Here are the Top 5 Fantasy Players from the #KKRvSRH clash in #TATAIPL 2023 ??
— IPL Fantasy League (@IPLFantasy) April 14, 2023
How many of them did you have in your Fantasy Team? pic.twitter.com/qsJlG9qL3y
इंग्लिश प्रीमियर लीग (English Premier League)
इंग्लिश प्रीमियर लीग ही फुटबॉल विश्वातील आणखी एक नामांकित अशी स्पर्धा आहे.नॅशनल फुटबॉल लीग आणि इंग्लिश प्रीमियर लीगचे चाहते जवळपास सारखेच आहेत. परंतु NFL च्या तुलनेत या टुर्नामेंटमध्ये गुंतवणूकदार कमी असल्याने तुलनेने येथे कमी उलाढाल होते. या टुर्नामेंटमध्ये 38 सामने खेळले जातात आणि 20 संघ यांत सहभाग घेतात. या लीगमध्ये प्रति सामन्यांत $11.23 दशलक्ष म्हणजेच 87 कोटी रुपयांची उलाढाल होते.
मेजर लीग बेसबॉल (Major League Baseball)
जगातील सर्वात जुनी प्रमुख व्यावसायिक बेसबॉल लीग म्हणून मेजर लीग बेसबॉल टुर्नामेंट ओळखली जाती. मेजर लीग बेसबॉल स्पर्धेत नॅशनल लीग (NL) आणि अमेरिकन लीग (NL) यां दोन महत्त्वाच्या लीगचा समावेश आहे, या दोन्ही लीगमधून प्रत्येकी 15 संघ स्पर्धेत उतरतात. MLB प्रत्येक सामन्यांतून $9.57 दशलक्ष म्हणजेच 76 कोटी रुपये कमावते.
5. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (National Basketball Association)
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBL) ही बास्केटबॉलशी संबंधित सर्वात लोकप्रिय टुर्नामेंट आहे. प्रति सामना $2.12 दशलक्ष म्हणजेच 16 कोटी रुपयांची उलाढाल या टुर्नामेंटमध्ये होते.1946 साली NBL च्या सामन्यांना सुरुवात झाली. दरवर्षी 30 संघ या सामन्यांना हजेरी लावतात. फॉर्ब्सच्या अहवालानुसार, NBL खेळाडू जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू आहेत.
Source: https://rb.gy/sltgb