• 06 Jun, 2023 17:49

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 Insurance Policies 2023: 'या' आहेत 2023 मधील LIC च्या टॉप 5 विमा पॉलिसी, यात गुंतवणूक करून मिळवू शकता अनेक फायदे

LIC Scheme

Image Source : www.shutterstock.com

LIC Scheme: भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली विमा पॉलिसी घेणे फार महत्वाचे आहे. आपल्याकडे अनेक विमा पॉलिसीचे ऑप्शन आहेत पण, उत्तम परतावा मिळेल अशीच पॉलिसी आपण घेतो. 2023 मधील टॉप 5 मध्ये असलेल्या एलआयसीच्या विमा पॉलिसीबद्दल माहित करून घेऊया.

LIC Scheme: महिन्याच्या कमाईमधून बचत तर आपण करतोच, पण बचतीसह तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली विमा योजना घेणे देखील आवश्यक आहे. परंतु इतक्या विमा योजनांमध्ये स्वतःसाठी सर्वोत्तम योजना कशी निवडावी याबाबत आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो. 2023 मध्ये टॉप 5 मध्ये असलेल्या काही विमा योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतील. 18 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. माहित करून त्या योजनांबद्दल. 

LIC जीवन अमर योजना 

ज्यांना कमी किमतीचा विमा काढायचा असेल त्यांच्यासाठी एलआयसी जीवन अमर योजना योग्य ठरू शकते. या पॉलिसीची मुदत 10 ते 40 वर्षांच्या दरम्यान असू शकते आणि नावनोंदणी वय 18 ते 65 दरम्यान आहे. या योजनेचे मॅच्युरिटीचे वय 80 वर्षे आहे. 25 लाखांपेक्षा जास्त मर्यादा नाही.

एलआयसी टेक टर्म प्लॅन

ज्यांना उच्च विमा रकमेसह कमी किमतीची विमा योजना हवी आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या योजनेसाठी नावनोंदणीचे वय 18 ते 65  वर्षे आहे आणि पॉलिसीची मुदत 10 ते 40  वर्षांच्या दरम्यान असू शकते. या योजनेचे मॅच्युरिटीचे वय 80 वर्षे आहे.

एलआयसी न्यू मनी-बॅक चाइल्ड प्लॅन

ही एक एलआयसीची न्यू मनी-बॅक चाइल्ड पॉलिसी आहे जी मुलांना आर्थिक सुरक्षा देते. मुलांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी ही पॉलिसी आहे. या योजनेची मुदत 25  वर्षे आहे. या योजनेत वय 0 ते 12 वर्षे असू शकते. या योजनेची रक्कम 1 लाख रुपयांपासून अमर्यादित रकमेपर्यंत असू शकते आणि मॅच्युरिटीचे वय 25 वर्षे आहे.

LIC न्यू जीवन आनंद

ही एंडॉवमेंट योजना विमा संरक्षण आणि बचत दोन्ही संधी देते. ज्यांना आपले भविष्य सुरक्षित करून भविष्यासाठी पैसे वाचवायचे आहेत त्यांच्यासाठी ही योजना योग्य असू शकते. या योजनेतील वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. पॉलिसीची मुदत 15 ते 35 वर्षांच्या दरम्यान कुठेही असू शकते. या योजनेंतर्गत विमा रक्कम  1 लाख ते अमर्यादित रकमेपर्यंत असू शकते आणि मॅच्युरिटीचे वय 75 वर्षे आहे.

LIC जीवन उमंग

ही होल लाइफ प्लस योजना विमाधारकाला त्याच्या आयुष्याच्या कालावधीसाठी संरक्षण देते. ज्यांना जीवन विमा हवा आहे त्यांच्यासाठी ही योजना योग्य असू शकते. या योजनेची पॉलिसी टर्म 100 वर्षे आहे. या योजनेचे वय 90 दिवस ते 55 वर्षे असू शकते. या प्लॅनचे मॅच्युरिटी वय 100 वर्षे आहे, आणि विम्याची रक्कम 2 लाख आणि अनंत दरम्यान कोणतीही रक्कम असू शकते.

(Source: navbharattimes.indiatimes.com)