LIC Jeevan Umang Policy : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC वर बहुतेक लोकांचा विश्वास आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जाते. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध योजना आणत असते. यापैकी एक म्हणजे LIC जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy). जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळू शकतो. जीवन उमंग पॉलिसी ही एंडोमेंट पॉलिसी आहे. तुम्ही या पॉलिसीमध्ये 15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. LICच्या जीवन उमंग पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज फक्त 45 रुपयांची बचत करून भविष्यात 27 लाख रुपयांची एकरकमी रक्कम जमा करू शकता.
काय आहे जीवन उमंग पॉलिसी?
ही एक एंडॉवमेंट पॉलिसी आहे जी बचतीच्या लाभासह विमा संरक्षण देते. या पॉलिसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर ग्राहकाच्या खात्यात दरवर्षी ठराविक रक्कम येते. याशिवाय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. ही पॉलिसी 100 वर्षांपर्यंत कव्हरेज देते.
जीवन उमंग पॉलिसीचे वैशिष्टे
- 90 दिवसांपासून ते 55 वर्षांपर्यंतचे लोक LIC ची जीवन उमंग पॉलिसी घेऊ शकतात.
- यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवल्यास तुम्हाला मोठी एकरकमी रक्कम मिळते.
- एलआयसीची ही पॉलिसी इतर पॉलिसींपेक्षा वेगळी आहे. ही एंडोमेंटसह संपूर्ण जीवन विमा योजना आहे.
- या पॉलिसीमध्ये, प्रीमियम पेमेंट टर्मनंतर, तुम्हाला आयुष्यभरासाठी किंवा 100 वर्षे वयापर्यंत विमा रकमेच्या 8 टक्के लाभ मिळतो.
- या पॉलिसी अंतर्गत, साध्या प्रत्यावर्ती बोनससह, अंतिम अतिरिक्त बोनसचा लाभ देखील ग्राहकांना दिला जातो.
- या पॉलिसीमध्ये प्रीमियमवरील कर सूट, मृत्यू लाभ आणि मॅच्युरिटी बेनिफिटचा लाभ दिला जातो.
- यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळू शकते.
जीवन उमंग पॉलिसीचे फायदे
ही पॉलिसी घेतल्यानंतर, तुमचे वय 100 वर्षे पूर्ण झाल्यास, पॉलिसी धारकास विमा रकमेसह सिंपल रिव्हर्शनरी बोनस, अंतिम अतिरिक्त बोनस दिला जातो. पॉलिसीधारकाला प्रीमियम भरण्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर एका वर्षापासून प्रत्येक वर्षी मूळ विमा रकमेच्या 8% मिळणे सुरू होते. तो 100 वर्षांचा होईपर्यंत किंवा मृत्यू होईपर्यंत त्याला दरवर्षी ही रक्कम मिळत राहते.
या पॉलिसी अंतर्गत, जोखीम सुरू होण्याच्या तारखेपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, भरलेले सर्व प्रीमियम नॉमिनीला परत केले जातात. जोखीम सुरू होण्याच्या तारखेनंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला मृत्यूवर विम्याची रक्कम दिली जाते. याशिवाय एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीमध्येही कर्जाची सुविधा दिली जाते. यासाठी तुम्हाला सलग तीन वर्षे प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतरच तुम्ही या पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम आणि व्याजदर हे कर्ज घेण्याच्या वेळेवर अवलंबून असतात.