Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LICs New Jeevan Amar: एलआयसीचा फ्लेक्झिबल फीचर्ससहित सुधारित टर्म प्लॅन जाणून घ्या

LICs New Jeevan Amar

Image Source : www.facebook.com

LICs New Jeevan Amar: एलआयसी ग्राहकांच्या सुविधांचा विचार करून नुकतीच “LIC New Jeevan Amar [प्लॅन 955]” ही स्कीम नवीन फीचर्ससह लॉन्च केली.

“जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी....” म्हणत LIC अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ घराघरांत जाऊन पोहोचली, त्यालादेखील आता साडेसहा दशकांहून अधिक काळ लोटला आहे. आज देखील “LIC काढली काय?” किंवा  “LIC घेतलीये ना!!!” किंवा “LIC चे पैसे मिळाले का?” असे रोजच्या बोलीभाषेमध्ये “पॉलिसी” किंवा “इन्शुरन्स” किंवा अगदी “डेथ-क्लेम”ला देखील समानार्थी शब्द म्हणून वापरले जात असतात. थोडक्यात “”विमा” म्हणजे “LIC” हे भारतीय मेंदूमध्ये फिट्ट बसलेले समीकरण (equation) झालेले आहे.

LIC देखील आपल्या ग्राहकांच्या जास्तीत जास्त सुविधांचा विचार करून चालु असलेले प्लॅन्स अधिक सुधारित फीचर्ससहित इन्शुरन्स-मार्केटमध्ये आणत असते. नुकत्याच सरलेल्या वर्षाच्या शेवटी LIC ने  असाच “LIC New Jeevan Amar [प्लॅन 955]” हा प्लॅन काही नवीन फीचर्ससह ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च केला आहे. 

LIC जीवन अमर [प्लॅन 855] ऐवजी नवीन जीवन अमर [प्लॅन 955]

LIC नवीन जीवन अमर [प्लॅन 955] ह्या प्लॅनने LIC तोवर चालू असलेल्या LIC जीवन अमर [प्लॅन 855] प्लॅनची जागा घेतली आहे. नव्याने लॉन्च केलेला हा “प्लॅन 955” नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टीसिपेटिंग, प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन असून हा “ऑफलाईन” पद्धतीने म्हणजे तुमच्या एजंट मार्फत खरेदी करता येणार आहे. LIC जीवन अमर [प्लॅन 855] ची विक्री कंपनीने बंद केलेली असून, ज्या पॉलिसी-इच्छुकांना प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करावयाचा असेल, त्यांना “प्लॅन 955” हा नवीन पर्याय देण्यात आलेला आहे. 

जीवन अमर प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन

LIC नवीन जीवन अमर हा प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन असल्याने यामध्ये “सर्व्हायव्हल बेनिफिट्स” किंवा “मॅच्युरिटी बेनिफिट्स” मिळत नाहीत. मात्र पॉलिसी टर्मच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पॉलिसीची रक्कम म्हणजे “Sum Assured” दिली जाते. पॉलिसीची रक्कम कमीत कमी २५ लाख निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. 

या टर्म-प्लॅन अंतर्गत पॉलिसीच्या रक्कमेचे 2 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत;  

Level Sum Assured (अर्थात पॉलिसीची निश्चित रक्कम)

या ऑप्शन मध्ये Sum Assured पॉलिसी टर्मच्या दरम्यान स्थिर असते. समजा, पॉलिसी खरेदी करीत असताना Sum Assured 1 कोटी असेल, तर तीच पॉलिसी-रक्कम संपूर्ण पॉलिसी टर्म कायम राहते.

Increasing Sum Assured (पॉलिसीची वाढत जाणारी रक्कम)

या ऑप्शन मध्ये पॉलिसीची रक्कम पहिली 5 वर्षे स्थिर राहणार आहे. नंतर  6व्या वर्षांपासून 15 व्या वर्षापर्यंत दरवर्षी Sum Assured मध्ये 10%  नी वाढत जाते. आणि जेव्हा Sum Assured मूळ रक्कमेच्या दुप्पट होईल, तेव्हा दरवषी होणारी वाढ थांबेल. त्यामुळे डेथ-बेनिफिट्स हे पॉलिसी काळामधील “कोणत्या वर्षी मृत्यू झाला” यावर अवलंबून असणार आहेत. समजा, Sum Assured 1 कोटी असेल. तर 6व्या वर्षी पॉलिसीची किंमत 1.10 कोटी होईल. 15 व्या वर्षांनंतर पॉलिसीची किंमत 2 कोटी होऊन नियमित होणारी वाढ थांबेल. 

LIC नवीन जीवन अमर प्लॅन अंतर्गत महिलांसाठी विशेष प्रीमियम दर असणार आहेत. तसेच “नॉन-स्मोकर” व्यक्तींनाही प्रीमियमची रक्कम तुलनेने कमी द्यावी लागणार आहे. त्याच्या आणखी काही ठळक बाबी पाहू.

  • पॉलिसीमधील प्रवेशाची वयोमर्यादा 18 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत ठेवली गेली आहे. आणि लाईफ कव्हरेज वय वर्षे 80 पर्यंत दिले जाणार आहे.
  • पॉलिसीची टर्म 10 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंत असणार आहेत, तर प्रिमिअमचा भरणा करण्यासाठी 4 प्रिमिअम पेमेंट मोड (PPM) देण्यात आलेले आहेत. एकरकमी (LumpSum), रेग्युलर पेमेंट, 5 वर्षे आणि 10 वर्षे.
  • डेथ-क्लेमचे पेमेंट देखील पॉलिसीच्या सुरुवातीच्या काळामध्येच निश्चित करावे लागेल. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला / कुटुंबाला एकतर क्लेमची अमाऊंट एकरक्कमी (Lump Sum) दिली जाते. किंवा पॉलिसीधारकाने ठरविले असल्यास त्याच्यापश्चात ही रक्कम 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 15 वर्षांमध्ये नॉमिनीला Instalment मध्ये दिली जाऊ जाते. 


फ्लेक्सिबिलिटी आणि फीचर्सचा विचार करता “नवीन जीवन अमर [प्लॅन क्रमांक 955]” ही एक चांगली योजना आहे. पॉलिसीच्या रक्कमेमध्ये वृद्धी होत असल्याने इन्फ्लेशनचा (चलनवाढीचा) विचार करून दुसरी वेगळी पॉलिसी घेण्याची गरज उरत नाही.

(डिसक्लेमर: कोणतीही पॉलिसी विकत घेण्यापूर्वी अधिकृत इन्शुरन्स एजंटचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी पॉलिसी खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)