नोकरी करणाऱ्यांकडे दरमहा एक निक्षित रक्कम येत असते. यामुळे अशा गुंतवणूकदारांना दरमहा आपले पैसे कुठल्या ना कुठल्या योजनेत गुंतवणे सोईचे ठरते. अशा गुंतवणूकदारांसाठी कोणते पर्याय उपयुक्त ठरू शकतात, ते जाणून घ्या.
Table of contents [Show]
एसआयपी (Invest in Systematic Investment Plan -SIP)
म्युच्युअल फंडमध्ये एकाच वेळी मोठी रक्कम जमा करणे शक्य नसेल तर अशा गुंतवणूकदाराला एसआयपीचा पर्याय उपलब्ध असतो. एसआयपी म्हणजे systematic investment plan. एसआयपी हा गुंतवणूकीचा पर्याय लोकप्रिय झालेला दिसतो. एखाद्या फंड स्कीममध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा करून दीर्घ कालावधीत एक मोठी रक्कम यातून तयार होण्याची शक्यता असते. दरमहा 500 रुपये इतक्या रकमेसहही एसआयपी सुरू करता येते. यात गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात.
आवर्ती ठेव (Invest in Recurring Deposits -RD)
आवर्ती ठेवी हादेखील नोकरदार वर्गासाठी एक पर्याय आहे. यातही दरमहा निश्चित रक्कम आपण जमा करू शकतो. ठराविक मुदतीनंतर व्याजासहीत एक निश्चित रक्कम आपल्याला मिळते.
नॅशनल पेन्शन स्कीम (Invest in National Pension Scheme -NPS)
नॅशनल पेन्शन स्कीम ही निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि एक मोठी रक्कम देणारी स्कीम आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर आपल्या इक्विटीचे प्रमाण ठरवता येते. दिलेल्या मर्यादेसह आपली रक्कम कुठे किती प्रमाणात गुंतवली जावी, हे ठरवण्याची संधी यात गुंतवणूकदाराला मिळते. तुम्हाला स्वत:ला काही ठरवायचे नसल्यास तसाही पर्याय उपलब्ध असतो. दरमहा पगार घेणाऱ्या गुंतवणूकदारांना यात दरमहा रक्कम गुंतवणे शक्य होते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Invest in Public Provident Fund)
15 वर्षाच्या लॉक इन कालावधीसाठी हा एक सुरक्षित पर्याय म्हणून स्वीकारला जातो. पाच -पाच वर्षाने ही मुदत वाढवूही शकता. यामुळे समजा तुमची 15 वर्षे पूर्ण झाली आणि तुमची नोकरी अजून शिल्लक असेल तर तुम्हाला त्यापुढेही पैसे जमा करत राहणे शक्य होऊ शकते. यामुळे हा कालावधी वाढवून अधिकचा लाभ देखील घेता येऊ शकतो. आपल्या जमा रकमेवर ठराविक कालावधीनंतर व्याज दिले जाते. चक्रवाढ पद्धतीने व्याजाचा लाभ या योजनेत मिळतो.
सोन्यामधील गुंतवणूक (Invest in Gold)
सोने हा देखील गुंतवणूकीचा पर्याय म्हणून आपल्यासमोर असतो. दीर्घकाळात परतावा देणारा हा एक चांगला पर्याय मानला जातो.
मुदत ठेव (Invest in fix Deposit -FD)
मुदत ठेव हादेखील सुरक्षित गुंतवणुकीचा एक पर्याय उपलब्ध असतो. आपली रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करून यातून निश्चित झालेल्या दराने परतावा मिळू शकतो.
पगारदार गुंतवणूकदारांची एक जमेची बाजू म्हणजे त्यांना दरमहा निश्चित पगार मिळतो. यामुळे दरमहा एक विशिष्ट रक्कम जमा करून दीर्घ कालावधीत परतावा देणारे पर्याय त्यांच्यासाठी आकर्षक ठरतात. याचबरोबर गुंतवणूकीचे अन्यही विविध पर्याय उपलब्ध असतात. आपल्या गरजांचा व सर्व योजनांचा तपशील बघून निर्णय घेणे योग्य ठरते.