गुंतवणूकदारांसाठी Real Estate हा एक पर्याय उपलब्ध असतो. अनेक जण दीर्घ कालावधीसाठी Real Estate गुंतवणूकीचा विचार करत असतात. या प्रकारच्या गुंतवणूकीसाठी देशातील 7 शहरांना पसंती मिळाली आहे. ही 7 शहरे कोणती ते जाणून घेऊया.
Real Estate Investment मध्ये 50 टक्क्याहून अधिक वाटा
दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरु, कोलकाता, चेन्नई अशी ही शहरे आहेत, या शहरांना गुंतवणूकदारांची पसंती मिळत मिळताना दिसत आहे. भविष्यातही भारतातील निवासी युनिट्सच्या एकूण विक्रीत या 7 शहरांचा वाटा मोठा असण्याचा अंदाज आहे. हा वाटा 50 टक्क्याहून अधिक असणे अपेक्षित आहे. या 7 शहरात 2014 मध्ये 3.43 लाख निवासी युनिट्स विकल्या गेल्या होत्या. यावर्षी 3.6 लाखांपर्यंत विक्री होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यातून या 7 शहरात गुंतवणूकीचा कल सातत्याने वाढताना दिसत आहे.
चालू वर्षात 2.73 लाख निवासी युनिट्सची विक्री
याविषयी अभ्यास करण्यासाठी देशातील प्रथम श्रेणी निवासी बाजाराचा डेटा गोळा करण्यात आलेला आहे. यानुसार, चालू वर्षीच्या पहिल्या 9 महिन्यातच 2.73 लाख निवासी युनिट्सची विक्री झाली आहे, ही माहिती मालमत्ता सल्लागार कंपनी अॅनारॉकच्या 2022 मधील अहवालातून जाहीर झाली आहे. या अहवलातून अजून एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे नागरिकांनी खरेदी केलेल्या बहुतेक assets या मोठ्या डेव्हलपरकडून केलेल्या होत्या. ज्यांना 10 वर्षाहून अधिक इतका कालावधी रिअल इस्टेट क्षेत्रात अनुभव आहे. या डेव्हलपर्सनी वेळेत प्रकल्प पूर्ण केले आहेत. यामुळे लोकांचा विश्वास वाढण्यास मदत झाली, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविड काळात Real Estate मध्ये मंदी
कोविड काळात Real Estate मार्केटला मंदीचा सामना करावा लागला होता. पण रिअल इस्टेट गुंतवणूकीच्या दृष्टीने एक फायदा असा झाला की, घरून काम करण्याचे प्रमाणं वाढले. याठिकाणी ऑफिस सेट अप तयार करण्यासाठी मोठ्या जागेची अनेक कर्मचाऱ्यांना गरज जाणवू लागली. यातून केवळ गुंतवणूक म्हणून नव्हे तर अधिक मोठ्या घराच्या गरजेतून देखील नवी प्रॉपर्टी खरेदी झाल्या.
एकूणच गुंतवणूक असो की स्वत:चे घर या कारणामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूकीचे प्रमाण वाढत आहे. यात दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरु, कोलकाता, चेन्नई या 7 शहरांचा वाटा मोठा आहे.