Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 Mutual Fund: या 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंडांनी 10 वर्षात दिला गुंतवणूकदारांना भरघोस परतावा

Top 5 Large Cap Mutual Fund

Top 5 Mutual Fund: म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने कंपन्यांच्या भांडवलानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. जसे मोठे भांडवल असणाऱ्या कंपन्या लार्ज कॅप (Large Cap Fund) त्यानंतर मिड कॅप (Mid-Cap Fund) आणि स्मॉल कॅप (Small Cap Fund) अशा कॅटेगरी आहेत. यातील ज्या लार्ज कॅप फंडांनी मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना कशाप्रकारे परतावा दिला आहे. हे समजून घेणार आहोत.

Top 5 Large Cap Mutual Fund: म्युच्युअल फंडमधील काही लार्ज कॅप स्कीम्सने गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षात भरघोस परतावा दिला आहे. त्यातील निवडक टॉप 5 लार्ज कॅप फंडबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने कंपन्यांच्या भांडवलानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. जसे मोठे भांडवल असणाऱ्या कंपन्या लार्ज कॅप (Large Cap Fund) त्यानंतर मिड कॅप (Mid-Cap Fund) आणि स्मॉल कॅप (Small Cap Fund) अशा कॅटेगरी आहेत. यातील ज्या लार्ज कॅप फंडांनी मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना कशाप्रकारे परतावा दिला आहे. हे समजून घेणार आहोत.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना त्या फंडाबद्दलची माहिती जाणून घेणे गरजेचे असते.  लार्ज कॅप कॅटेगरीतील फंड हे विशेषकरून स्टेबल आणि धीम्या गतीने वाढणारे फंड मानले जातात. त्यात स्मॉल कॅप फंडप्रमाणे इतकी अस्थिरता (Volatility) दिसून येत नाही. त्यामुळे लार्ज कॅप फंडमधील गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पण कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपली आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत? आपण किती जोखीम स्वीकारू शकतो? तसेच गुंतवणुकीतून किती परतावा अपेक्षित आहे? याची माहिती घेऊन यामध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.

Title लार्ज कॅप कॅटेगरीतील टॉप 5 फंड  (2)

बेस्ट लार्ज कॅप म्युच्युअल फंड

कोणत्याही कॅटेगरीतील बेस्ट म्युच्युअल फंडची निवड करताना त्या फंडाची काम करण्याची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे. तसेच त्यामध्ये जमा होणारी गुंतवणूक ही कोणत्या सेक्टरमध्ये आणि किती वर्षांपासून केली जाते, हे पाहणे गरजेचे असते. तर आज आपण लार्ज कॅपमधील बेस्ट टॉप 5 फंडानी मागील 10 किती आणि कसा परतावा दिला आहे, हे जाणून घेणार आहोत.

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड (Nippon India Large Cap Fund)

निप्पॉन इंडिया म्यु्च्युअल फंड हाऊसमधील लार्ज कॅप फंडने गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत 16.89 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी या फंडमध्ये 10,000 गुंतवणूक केली असती, तर त्याची आज 47,719 रुपये मूल्य असते. या फंडाने गुंतवणूकदारांना वार्षिक 16.89 टक्के परतावा दिला आहे.

तसेच गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपासून या फंडामध्ये 1 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची एकूण गुंतवणूक 1,20,000 रुपये असते आणि त्याचे आजचे मूल्य 2,69,306 रुपये असते. गुंतवणूकदाराला यातून वर्षाला 15.43 टक्के परतावा मिळाला आहे.

मिराई अ‍ॅसेट लार्ज कॅप फंड (Mirae Asset Large Cap Fund)

मिराई अ‍ॅसेट लार्ज कॅप फंडाने गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षात 17.77 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी या फंडमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आजचे मूल्य 51,420 रुपये असते. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडामध्ये प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची एसआयपी केली असती, तर 10 वर्षात जमा झालेल्या 1 लाख 20 हजार रुपयांचे मूल्य 2,63,586 रुपये असते. यातून गुंतवणूकदारांना 15.03 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.

एसबीआय ब्ल्यूचीप फंड (SBI Bluechip Fund)

एसबीआय ब्ल्यूचीप फंडने गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत 16.52 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी या फंडमध्ये 10,000 गुंतवणूक केली असती, तर त्याची आज 46,220 रुपये मूल्य असते. या फंडाने गुंतवणूकदारांना वार्षिक 16.52 टक्के परतावा दिला आहे.

तसेच गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपासून या फंडामध्ये 1 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची एकूण गुंतवणूक 1,20,000 रुपये असते आणि त्याचे आजचे मूल्य 2,58,522 रुपये असते. गुंतवणूकदाराला यातून वर्षाला 14.67 टक्के परतावा मिळाला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्टिशिअल ब्ल्यूचीप फंड (ICICI Prudential Bluechip Fund)

आयसीआयसीआय प्रुडेन्टिशिअल ब्ल्यूचीप फंडाने गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षात 14.88 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी या फंडमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आजचे मूल्य 44,375 रुपये असते. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडामध्ये प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची एसआयपी केली असती, तर 10 वर्षात जमा झालेल्या 1 लाख 20 हजार रुपयांचे मूल्य 2,67,230 रुपये असते. यातून गुंतवणूकदारांना 15.29 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.

एचडीएफसी टॉप 100 फंड (HDFC Top 100 Fund)  

एचडीएफसी म्यु्च्युअल फंड हाऊसमधील एचडीएफसी टॉप 100 फंडने गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत 14.88 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी या फंडमध्ये 10,000 गुंतवणूक केली असती, तर त्याची आज 43,084 रुपये मूल्य असते. या फंडाने गुंतवणूकदारांना वार्षिक 14.88 टक्के परतावा दिला आहे.

तसेच गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपासून या फंडामध्ये 1 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची एकूण गुंतवणूक 1,20,000 रुपये असते आणि त्याचे आजचे मूल्य 2,57,004 रुपये असते. गुंतवणूकदाराला यातून वर्षाला 14.56 टक्के परतावा मिळाला आहे.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)