Best Mutual Fund for Long Term: म्युच्युअल फंडमध्ये कंपन्यांच्या कॅटेगरीनुसार गुंतवणूक करता येते. यात प्रामुख्याने लार्ज कॅप (Large Cap Fund), मिडिअम कॅप (Mid-Cap Fund) आणि स्मॉल कॅप (Small Cap Fund) अशा 3 कॅटेगरीनुसार फंडांचे वर्गीकरण केले जाते. यामध्ये कंपन्यांच्या भांडवलानुसार प्रकार पडतात. आज आपण म्युच्युअल फंडमधील लार्ज कॅप फंडबद्दल जाणून घेणार आहोत. या कॅटेगरीतील बेस्ट फंड कोणते आणि त्यांनी मागील काही वर्षात कशाप्रकारे परतावा ग्राहकांना दिला आहे. हे समजून घेणार आहोत.
बेस्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय?
कोणत्याही कॅटेगरीतील बेस्ट म्युच्युअल फंडची निवड करताना त्या फंडाची काम करण्याची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बेस्ट फंड निवडताना गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत? तो किती जोखीम स्वीकारू शकतो. तसेच गुंतवणूक किती वर्षांसाठी करायची आहे. असे दोन्ही बाजूच्या माहितीच्या आधारावर बेस्ट फंडची निवड करता येऊ शकते.
आज आपण लार्ज कॅप फंडमधील बेस्ट स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास कोणत्या फंडांनी चांगले रिटर्न्स दिले आहेत. हे आपण समजून घेणार आहोत.
वर तक्त्यामध्ये दिलेल्या फंडांनी प्रत्येक कालावधीत वेगवेगळा परतावा दिला आहे. यावरून गुंतवणुकीचा कालावधी हा किती महत्त्वाचा आहे. हे आपल्याला कळते. दीर्घकालीन गुंतवणुकीत अनेक फंडांनी एक आणि 5 वर्षांच्या तुलनेत 3 वर्षात चांगला परतावा दिल्याचे दिसून आले. एसाआयपीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गुंतवणुकीतून वेगवेगळे रिटर्न्स मिळाले आहेत. तसेच लार्ज कॅप फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.तर काही फंडांसाठी 500 आणि 1000 रुपयांची किमान SIP करावी लागते.
(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)