Small Cap Mutual Funds: जर गुंतवणुकदारांना आपल्या संपत्तीत वाढ करायची असल्यास म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक त्यांच्यासाठी बेस्ट पर्याय ठरु शकतो. कारण, म्युच्युअल फंड शेअर्स, बाॅण्ड्स, सिक्युरिटीज आणि अन्य अनेक अॅसेट्समध्ये गुंतवणूक करतात.
त्यामुळे रिस्क कमी आणि रिटर्न जास्त मिळण्याची शक्यता तयार होते. तुम्ही मार्केटमधील स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचे ठरवले असले तर आम्ही तुमच्यासाठी पाच म्युच्युअल फंड घेऊन आलो आहोत.
ज्यांनी गेल्या पाच वर्षांत 31 ते 42 टक्के SIP द्वारे रिटर्न दिला आहे. तसेच, ज्या कंपन्यांचे मार्केट भांडवल 5,000 कोटींपेक्षा कमी असते, त्यांना स्मॉल कॅप कंपनी म्हटल्या जाते. या फंडांविषयी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (AMFI) 18 सप्टेंबर 2023 पर्यंतची माहिती कलेक्ट केली आहे.
Table of contents [Show]
क्वांट स्मॉल कॅप फंड
Quant Small Cap Fund ने गेल्या पाच वर्षांत सरासरी SIP रिटर्न 42.69 टक्के वार्षिक दिला आहे. या फंडात प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये SIP करणाऱ्या गुंतवणुकदाराकडे पाच वर्षांत 16.82 लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम जमा झाली असती. या फंडात प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांपासून SIP सुरू करता येते.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
Nippon India Small Cap Fund ने गेल्या पाच वर्षांत सरासरी SIP रिटर्न वार्षिक 35.8 टक्के दिला आहे. या फंडात किमान गुंतवणूक 5,000 रुपये असून प्रत्येक महिन्याला कमीतकमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.
एचएसबीसी स्मॉल कॅप फंड
HSBC Small Cap Fund ने मागील पाच वर्षात सरासरी SIP रिटर्न वार्षिक 31.82 टक्के दिला आहे. समजा तुम्ही या SIP मध्ये प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये टाकले असते तर तुम्हाला आत्ता 13.08 लाख मिळाले असते.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड
HDFC Small Cap Fund चा गेल्या पाच वर्षात सरासरी SIP रिटर्न वार्षिक 31.16 टक्के राहिला आहे. या फंडमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कमीतकमी 100 रुपयांपासून करू शकणार आहात.
युनियन स्मॉल कॅप फंड
Union Small Cap Fund ने गेल्या पाच वर्षांत सरासरी SIP रिटर्न वार्षिक 30.41 टक्के राहिला आहे. तुम्ही देखील या फंडात प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये गुंतवले असते, तर तुमच्याजवळ आता 12.65 लाख जमा झाले असते.
वरील म्युच्युअल फंडांचा सरासरी वार्षिक रिटर्न डोळे दीपवणारा आहे. त्यामुळे हे आकडे पाहून फंडात पैसे गुंतवल्यास नक्कीच फायदा होणार आहे. तरी गुंतवणूक करण्याआधी फंडाचे चार्जेस पाहणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)