Businesses : घरातील जबाबदारी सांभाळत असतांना स्त्रियांना अनेकदा आपले अस्तित्व विसरावे लागते. घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, नोकरी करू शकत नाही, मग महिलांसाठी एकाच पर्याय उरतो. तो म्हणजे घरगुती व्यवसाय. अनेक महिला घरगुती व्यवसाय करून आपल्या आपले कुटुंब सांभाळत आहे. घरातील जबाबदारी पार पाडल्यानंतर उरलेल्या वेळात महिला घरगुती व्यवसाय करू शकतात. मग महिलांनी कोणते व्यवसाय करायचे? त्यासाठी किती खर्च येतो? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घेऊया.
Table of contents [Show]
द्रोण पत्रावळी घरघुती उद्योग
काही वर्षापूर्वी सर्वत्र पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी आणि द्रोण वापरल्या जात होते. आता त्या पत्रावळीची जागा पेपर डिशने घेतली आहे. पण पर्यावरणाला हानी होणार नाही याचा विचार करून महिला अजूनही पळसाच्या पानाची पत्रावळी आणि द्रोण तयार करून त्याचा व्यवसाय उभारू शकतात. पर्यावरणपूरक व्यवसायाला सरकरकडूनही प्रोत्साहन दिले जाते. यातून तुम्हाला दरमहा चांगला नफा मिळू शकतो. कमीत कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय उभा केला जाऊ शकतो.
कापडी पिशव्या घरघुती उद्योग
पर्यावरण हानी रोखण्यासाठी सरकारकडून प्लॅस्टिक पिशवी बंद करण्याचे आदेश दिले आहे. म्हणून आता प्लॅस्टिक पिशवीला ऑप्शन म्हणून लोकांना कापडी पिशवी वापरण्याशिवाय पर्याय नाही. हीच बाब लक्षात घेऊन तुम्ही कापडी पिशवीचा घरगुती व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये भांडवल गुंतवावे लागेल. यातून तुम्ही भरपूर कमाई सुद्धा करू शकता आणि पर्यावरण हानी होण्यापासून सुद्धा वाचवू शकता.
कागदी पिशव्या घरघुती उद्योग
मार्केटमधून कोणतीही वस्तु आणायची म्हटलं तर आपल्याला प्लॅस्टिक पिशवी दिली जाते. त्यावर सरकारने बंदी आणली आहे तरीही त्याच पिशवीचा वापर अनेक ठिकाणी सुरू आहे. पण प्लॅस्टिक पिशवीला पर्याय म्हणून दररोजच्या वापरासाठी कागदी पिशवीचा वापर केला तर प्लॅस्टिक पिशवी बंद करण्यासाठी आपण मोलाचे योगदान देऊ शकतो. कागदी पिशवी मेडिकल, किराणा दुकान, फळांचे दुकान, हॉटेल्स येथे दिसून येते. उत्तम दर्जाचा आणि हानिकारक नसलेला पेपर वापरुन तुम्ही कागदी पिशव्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागेल. यातून चांगला नफा मिळू शकतो.
पापड घरघुती उद्योग
अनेक महिला उन्हाळ्यामध्ये पापड बनवतात आणि त्याची विक्री करतात. नोकरी करणाऱ्या महिलांना उन्हाळी कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण त्यांना घरगुती पापड हवे असतात. याच बाबी लक्षात घेऊन तुम्ही पापड उद्योग तयार करू शकता. यातून अनेक महिलांना रोजगार सुद्धा मिळेल. जे लोकं खाण्याचे जास्त शौकीन असतात त्यांना बाराही महीने वेगवेगळे पदार्थ बनवून खायला आवडतात. काही पदार्थ असे असतात ज्यासोबत पापड हा लागतोच. अशा लोकांच्या ऑर्डर तुम्हाला मिळू शकतात. पापड उद्योगातून भरपूर नफा मिळवता येऊ शकतो.