Best Tablets: सध्या बरेच जण संगणकावर काम करण्यापेक्षा अनेकांचा कल हा लॅपटॉप(Laptop) किंवा टॅबवर(Tap) काम करण्याकडे वाळलेला आहे. याच पहिलं कारण म्हणजे अर्थातच वजन(Weight) किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाणं. टॅबलेट आल्यामुळे तुम्हाला कुठेही बसून काम करण्याची मुभा मिळू लागली. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट फीचर्स(Features) असणाऱ्या आणि 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत(Price) मिळणाऱ्या टॅबबद्दल माहिती देणार आहोत. चला तर या टॅब बद्दल माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
Realme Pad X
Realme या टॅबलेटची किंमत 19,999 रुपये असून यामध्ये 11 इंचाचा डिस्प्ले येतो. 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅमसह 5 जीबी व्हर्च्युअल रॅम सुद्धा यामध्ये देण्यात आली आहे. या टॅबलेटमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा मिळणार आहे. यात चार डॉल्बी ऍटमॉस स्पीकर असून याची बॅटरी 8340 mAh इतक्या क्षमतेची आहे.
Lenovo Tab M10
Lenovo Tab M10 मध्ये 10.61 इंचाचा फुल डिस्प्ले अणि स्नॅपड्रॅगन एसडीएम 6803 हा प्रोसेसर मिळणार आहे. याशिवाय 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम देण्यात आली आहे. याचे स्टोरेज मायक्रो कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येणे शक्य आहे. याची बॅटरी 7700 mAh क्षमतेची असून सेल्फी कॅमेरा 1 मेगापिक्सलचा आहे व रियर कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. या टॅबची किंमत फ्लिपकार्टवर 19,999 रुपये आहे.
Oppo Pad Air
या टॅबमध्ये 10.36 इंचाचा 2के डिस्प्ले मिळत आहे. या टॅबची रॅम 4 जीबी असून ती 7 जीबी पर्यंत वाढवता येते. यात 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सुद्धा मिळत आहे. याशिवाय 7100mAh क्षमतेची बॅटरी तुम्हाला मिळणार आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह याची किंमत 15,499 रुपये असणार आहे, तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी 19,999 रुपये किंमत मोजावी लागणार आहे.
Samsung Galaxy Tab A8
Samsung Galaxy Tab ची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. यामध्ये 10.5 इंचाचा डिस्प्ले व चार स्पीकर मिळत आहेत. याशिवाय रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल असून सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसोबत मायक्रो कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येत आहे.