Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 10 Billionaires मध्ये एकही भारतीय नाही! अंबानी आणि अदानी यांचा क्रमांक कितवा?

Ambani and Adani

जगातील श्रीमंतांच्या यादीतील अनेक अब्जाधीशांच्या संपत्तीत चढउतार झाल्यामुळे क्रमवारीत बदल झाला आहे. भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे पहिल्या 10 श्रीमंताच्या यादीत नाहीयेत. जाणून घ्या त्यांच्या संपत्तीत झालेले बदल...

Bloomberg Billionaires Index मध्ये जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीच्या चढउताराच्या आधारे एक यादी बनवली जाते. आज म्हणजे मंगळवार, 26 जुलै 2023 नुसार जगभरातील श्रीमंताच्या टॉप-10 यादीत एकही भारतीय उद्योगपती नाहीये. होय, भारतातील सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असेलेले गौतम अदानी हे दोघेही उद्योगपती टॉप-10 यादीत नाही. असे असले तरी आशिया खंडातील श्रीमंताच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे मुकेश अंबानी आणि चिनी अब्जाधीश झोंग शानशान हेच कायम आहेत.

कोण आहे सर्वाधिक श्रीमंत?

जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत पहिले स्थान एलन मस्क (Elon Musk)  यांनी कायम ठेवले आहे.  2.7 अब्ज डॉलर्सचे त्यांना नुकसान झाले असूनही मस्क 236 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.फ्रान्सचे प्रतिथयश उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) 201 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनतर अमेरिकन उद्योगपती जेफ बेझोस (Jeff Bezos) हे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 154 अब्ज डॉलर्स इतक आहे.

या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांची संपत्ती 138 अब्ज डॉलर इतकी आहे. तर अमेरिकन उद्योगपती  लॅरी एलिसन (Larry Ellison) हे 133 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या, तर स्टीव्ह बाल्मर (Steve Ballmer) 122 बिलियन डॉलर्ससह सहाव्या, वॉरन बफे (Warren Buffett)  117 बिलियन डॉलर्ससह सातव्या स्थानावर आहेत.

अमेरिकेतील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती लॅरी पेज (Larry Page) यांच्याकडे 112 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून ते ८व्या स्थानावर आहेत.तर मेटाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) 107 अब्ज डॉलर्ससह 9 व्या क्रमांकावर आहेत. तर रशियातील उद्योगपती सर्गे ब्रिन (Sergey Brin) 106 अब्ज डॉलर्ससह 10व्या स्थानावर आहेत.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ!

जगातील श्रीमंतांच्या यादीतील अनेक अब्जाधीशांच्या संपत्तीत घट आणि वाढ झाल्यामुळे क्रमवारीत बदल झाला आहे. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी 3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून ते श्रीमंताच्या यादीत 19 व्या स्थानी आहेत. तर आशियातील श्रीमंताच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 63.8 बिलियन डॉलर्स इतकी आहे.तसेच मुकेश अंबानी यांची संपत्ती 95.3 बिलियन डॉलर्स इतकी असून त्यांच्या संपत्तीत 245 लक्ष डॉलर्सची वाढ  नोंदवली गेली आहे.